मुंबई : 'बिग बॉस'च्या मराठी पर्वाची दणक्यात सुरुवात झाली. महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या अत्यंत ग्लॅमरस ग्रँड प्रिमिअर रविवारी कलर्स मराठी वाहिनीवर झाला. मराठी मनोरंजन विश्वातील एक-एका स्पर्धकाने परफॉर्म करत बिग बॉसच्या घरात दमदार प्रवेश केला.


15 स्पर्धकांचा सहभाग असलेल्या मराठी बिग बॉसचं प्रक्षेपण सोमवार ते शनिवार दररोज रात्री साडेनऊ वाजता कलर्स मराठीवर होईल. बिग बॉसचं घर हा सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. यंदाही उत्तम सोयी सुविधा असलेल्या, मात्र टीव्ही, पेपर, मोबाईलपासून मैलो दूर असलेल्या बिग बॉसच्या देखण्या घरात स्पर्धकांना शंभर दिवस काढायचे आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणारी पहिली स्पर्धक होती बोल्ड अँड ब्यूटीफूल अभिनेत्री रेशम टिपणीस. रेशमने अनेक हिंदी मराठी मालिका-चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. लालबाग-परळमध्ये रेशमने केलेला 'तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा' गाण्यातील नृत्याविष्कार प्रचंड गाजला होता.

'चला हवा येऊ द्या'मुळे घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता विनित बोंडे हा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणारा दुसरा स्पर्धक होता. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला विनित जेमतेम महिन्याभरापूर्वी विवाहबंधनात अडकला आहे.

'पुढचं पाऊल' मालिकेमुळे लोकप्रिय झालेली रडकी सूनबाई अर्थात जुई गडकरी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारी तिसरी स्पर्धक होती. जुईचा ऑनस्क्रीन नवरा अर्थात अभिनेता आस्ताद काळेच्या जोडीनेच तिने शोमध्ये परफॉर्म करत गृहप्रवेश केला. आस्तादने असंभव, सरस्वती सारख्या अनेक लोकप्रि

अत्यंत आगळ्या वेगळ्या लूकमुळे प्रसिद्ध असलेले रंगीबेरंगी पत्रकार अनिल थत्ते हे बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारे पाचवे स्पर्धक होते.

'पप्पी दे पारु ला' गाण्यामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने बाईकवरुन दमदार एन्ट्री करत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.

विनोदी मंचावर हास्यकल्लोळ करणारी जोडगोळी म्हणजे अभिनेता भूषण कडू आणि अभिनेत्री आरती सोळंकी. दोघांनी जोडीने परफॉर्म करत बिग बॉसच्या मंचावर प्रवेश केला.

आपल्या आवाजाच्या जोरावर जरब निर्माण करणारी, मात्र मनोरंजन विश्वातील लेकरांवर माया करणारी सर्वांची लाडकी आऊ अर्थात अभिनेत्री उषा नाडकर्णी. उषा नाडकर्णींच्या प्रवेशामुळे स्पर्धकांचे चेहरे खुलले खरे, मात्र आऊ बिग बॉसच्या घरात राडा करणार की माया, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. उषा नाडकर्णींनी अनेक हिंदी-मराठी सिनेमांमध्ये खाष्ट सासू रंगवली आहे. माहेरची साडी पासून पवित्र रिश्ता, खुलता कळी खुलेना पर्यंत आऊंची अनेक रुपं पाहायला मिळाली.

अभिनेत्री मेघा धाडे ही बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारी दहावी स्पर्धक होती. मेघा मॅटर, मान सन्मान यासारख्या काही चित्रपटांमध्ये झळकली आहे.

बाल कलाकार म्हणून मराठी सिनेविश्वात पाऊल ठेवणारा 'जबरदस्त' अभिनेता, डान्सर पुष्कर जोग बिग बॉसच्या घरात जाणारा अकरावा स्पर्धक होता. पुष्करने अनेक डान्स रिअॅलिटी शो गाजवले आहेत. त्याशिवाय 'माझा अराऊण्ड द वर्ल्ड'चं सूत्रसंचालनही त्याने केलं होतं.

मिशन चॅम्पियन, प्लॅटफॉर्म अशा मराठी, तर कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करु' या हिंदी सिनेमात झळकलेली अभिनेत्री सई लोकूर बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

रात्रीस खेळ चाले या प्रचंड गाजलेल्या मालिकेत सुषमा अर्थात सुसल्या ही नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात झळकणार आहे. ती सहस्पर्धकांमध्ये भीती निर्माण करते, की सर्वांशी जुळवून घेते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

बिग बॉसच्या घरात शेवटच्या दोन स्पर्धकांनी एकत्रच एन्ट्री घेतली. राजकारणींचा अभिनय करणारा अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि अभिनयात राजकारण 'आणणारा' अभिनेता सुशांत शेलार यांनी 'सावधान-सावधान वणवा पेट घेत आहे' म्हणत 'बिग बॉस'मध्ये प्रवेश केला.

बिग बॉसचे नियम

नियम मोडल्यास हिंदी बिग बॉसमध्ये 50 लाख रुपये दंड होता. मात्र मराठीत तो तब्बल दोन कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. हिंदी बिग बॉसमध्ये टोकाचे वाद, शिवीगाळ अशा प्रकारांमुळे ही मालिका नेहमीच वादात राहिली. मात्र मराठी कलाकारांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे या पहिल्याच पर्वात काय होतं, याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.

वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या ‘बिग बॉस’ची लोकप्रियता अनेकांना माहित आहे. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘बिग बॉस’च्या मराठी आवृत्तीला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मांजरेकर बिग बॉस

मराठी मनोरंजन विश्वाचे बिग बॉस असलेल्या महेश मांजरेकर यांच्या हाती ' मराठी बिग बॉस'ची सूत्रं आहेत. हिंदी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन अर्शद वारसीने केलं होतं. दुसऱ्या पर्वात शिल्पा शेट्टी, तिसऱ्यात खुद्द बिग बी अमिताभ बच्चन होस्टच्या भूमिकेत होते. चौथ्या पर्वानंतर मात्र अकराव्या सिझनपर्यंत ही दोर सलमानच्या हाती राहिली.

हिंदीची परंपरा

हिंदी बिग बॉसमध्ये प्रत्येक क्षेत्रातून एखादा सेलिब्रेटी घेण्याची परंपरा अकरा सिझनमध्ये सुरु आहे. रिअॅलिटी शो विजेता, ब्यूटी पेजंट विजेती, मॉडेल, आयटम गर्ल, डेली सोप स्टार, चित्रपट अभिनेता-अभिनेत्री, विनोदी अभिनेता, चित्रपटातून लुप्त झालेले सेलिब्रेटी, राजकीय व्यक्ती, एलजीबीटी समुदायातील व्यक्ती, कायदा मोडल्याने चर्चेत आलेला सेलिब्रेटी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार, गायक, क्रीडापटू, फॅशन डिझायनर अशा विविध पार्श्वभूमीचे कलाकार निवडले जातात.