मुंबई : बिग बॉस मराठीचा (Big Boss Marathi 5) यंदा पाचवा सीझन सुरु आहे. यंदाचा बिग बॉस मराठीचा सीझन पहिल्या दिवसापासूनच खूप चर्चेत आहे. यंदा बिग बॉसचा सीझन काहीसा वेगळा आहे. नवं घर, नवी थीम, नवे स्पर्धक आणि नवा होस्ट असा यंदाचा सीझन आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात , अभिनेते, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि  गायक असे सदस्य स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. यातील एका सदस्याची एन्ट्री अनेकांना आधी पटली नव्हती, पण हा सदस्य आता घरातील इतर सदस्यांप्रमाणेच महाराष्ट्राचाही लाडका सदस्य ठरला आहे.


नेटकऱ्यांचा 'गुलीगत किंग'ला फुल सपोर्ट


बिग बॉस मराठीच्या घरात यंदा स्पर्धक म्हणून सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची एन्ट्री झाली. यातील एक मातीतील माणूस म्हणजे सूरज चव्हाण. टिक टॉकवर गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण यंदा बिग बॉस मराठीमध्ये सामील झाला आहे. टिक टॉक स्टार आणि रिल स्टार सूरज चव्हाणची बिग बॉसमध्ये एन्ट्री झाली तेव्हा अनेकांनी बिग बॉस शोला ट्रोल केलं. पण, याच सूरज चव्हाणने आता अवघ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे.






'बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणच होणार


घरातील इतर कलाकार मंडळीसमोर सूरज आधी खूप शांत होता, मात्र बिग बॉसने त्याचा आत्मविश्वास वाढवला आणि मग सूरज गुलीगत नडला. शोमध्ये सूरज एकटा नडतो आणि एकटा भिडतो, सूरजचा हाच स्वभाव महाराष्ट्रातील जनतेच्या पसंतीस उतरला आहे. घरातील इतर सदस्य जिथे प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी भांडणं आणि लव्हस्टोरीचा अँगल देत आहेत, तिथे साधा भोळा सूरज आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे.


बिग बॉस प्रेमींना विश्वास


सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा गुलीगत किंग सूरज चव्हाणला फुल सपोर्ट असल्याचं दिसत आहे. नेटकरी सूरज चव्हाणसाठी कमेंट करत त्याला पाठिंबा देताना दिसत आहे. बिग बॉसमध्ये आल्यावर सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही वाढ झाली आहे. सूरज चव्हाणचे इंस्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहे. महत्त्वाचं म्हणजे सूरजला चॅलेंज देणाऱ्या जान्हवीपेक्षाही सूरजचे फॉलोअर्स चार पटीने जास्त आहेत.






सूरजला पाठिंबा देण्यासाठी नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस


प्रेक्षकांना सूरजचा खेळ फार आवडत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेत सूरज चव्हाण व्हावा, अशी अपेक्षा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकाने कमेंट करत लिहिलंय, 'बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण व्हावा अशी ज्यांची मनापासून इच्छा आहे, त्यांनी इथे पाठिंबा दर्शवावा'. दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये म्हटलं, 'सूरज चव्हाण रिस्पेक्ट बटन'. आणखी एकाने लिहिलंय, 'ज्याच्या मुळे शोचा TRP वाढला असा एकमेव स्पर्धक म्हणजे सूरज'. बिग बॉस मराठीच्या आधीचा स्पर्धक उत्कर्ष शिंदे यानेही सूरजसाठी कमेंट करत लिहिलंय," ही ड्यूटी नकों ती ड्यूटी नकों कधी बोलला❌ शिक्षण नसुनही कधी भाषेत माज्ज दुसऱ्यांचा अपमान दिसला?❌ कोणा बद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? ❌ कोणत्या मुलीचा अपमान केला?❌ गेम मधे टिकण्या साठी खोटं प्रेमाच नाटक , रडण रुस्ण फुग्ण असल काही एक केल का ❌ एकटा राहतो एकटा खेळतो एकटा भिडतो एकटा नडतो आणि एकटाच पुढे पण असणार, दिसणार."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीसाठी गुलीगत सूरज चव्हाणला किती मानधन? धनंजय दादा आणि छोटा पुढारीची फी किती?