मुंबई : भांडण, वाद, प्रेम प्रकरण यामुळे बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेत. हीना आणि शिवमध्येही कायम वाद होत असतात. मग ते वीणावरुन असो वा टास्क दरम्यान असो. आजच्या एपिसोडमध्येही हीना आणि शिवमध्ये वादाची ठिणगी उडणार आहे.


ग्रुपमधील सदस्य एकत्र बसले असताना वैशाली, शिव आणि अभिजीत यांच्यामध्ये गप्पा सुरु होत्या आणि ते एकमेकांची थट्टा करत होते. हीना अभिजीतच्या हाताला क्रेप बँडेज लावत होती. तर वैशाली शिवला अभिजीतवरुन म्हणाली की, "नात्यांमध्ये तो गल्लत करत नाही." त्यावर अभिजीतही म्हणाला अगदीच खरं आहे. शिवने यावरुन अभिजीतला चिडवायला सुरुवात केली.

पण हीनाला या गोष्टीचा राग आला आणि ती शिववर भडकली. हीनाने शिवला खडसावून सांगितलं, पुन्हा असं बोललास तर मी खूप घाणेरड्या शब्दात उत्तर देणार." यावर शिवही तिला म्हणाला की मी तुझ्याशी गंमत केली नाही, माझ्याशी असं बोलायचं नाही." शिव इथेच थांबला नाही तो पुढे म्हणाला की, तुला गोष्टी कळत नाही तर मला विचार."

शिव असं काय म्हणाला ज्यावरुन हीना त्याच्यावर इतकी चिडली? आता हे भांडण किती विकोपाला जाणार, कोण नमतं घेणार हे आजच्या भागामध्ये कळेल.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. ज्यामध्ये माधवने बाजी मारुन घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकवला. तसंच काल घरामध्ये नॉमिनेशन कार्यही पार पडलं. ज्यामध्ये किशोरी शहाणे, सुरेखा पुणेकर, हीना पांचाळ, वैशाली माडे आणि रुपाली भोसले नॉमिनेट झाले. आता या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार? कोणाला प्रेक्षकांची मतं वाचवणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.