Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेत राज-कावेरीचा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार आहे. ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. राज कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि हे दोघे कधी एकत्र येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. अखेर आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन. कावेरी आणि राजवर्धनच्या या गोष्टीमध्ये अनेक अनपेक्षित वळणं आली. कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी दुरावा. पण आता मंडप सजला आहे, तोरण लागली आहेत. मुहूर्तदेखील निघाला आहे, स्थळ देखील निश्चित झालं आहे. लवकरच कावेरी आणि राज लग्नबंधनात अडकणार आहेत.
आनंदात पार पडणार राज-कावेरीचा विवाहसोहळा
राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे. लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे. नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे. त्यांचं लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पर पडणार आहेत. खऱ्या अर्थाने राजला कावेरीची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे. इतक्या दिवसांनंतर या दोघांच्या आयुष्यात आलेला हा आनंद असाच टिकून राहो, अशी इच्छा प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
रत्नमाला म्हणजेच निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या लग्नाबद्दल म्हणाल्या, "लग्नामुळे सेटवर आनंदी वातावरण आहे, जय्य्त तयारी सुरू झाली आहे. मोहितेंचे घर सकारात्मकतेने, आपल्या माणसांनी, नातेवाईकांनी बहरून जाणार आहे. जितका आनंद आम्हांला आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे. कारण तेदेखील या दिवसाची वाट आतुरतेने बघत होते. तेव्हा राज - कावेरीच्या लग्नाला नक्की यायचं हे आमच्याकडून सगळयांना आग्रहाचे निमंत्रण आहे”.
राज - कावेरीचा लग्नसोहळा कधी पार पडणार?
26 फेब्रुवारी दु. 1 आणि संध्याकाळी 7 वा.
संबंधित बातम्या