ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार किरण नगरकर यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2019 09:26 AM (IST)
साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून भाषेच्या सीमा ओलांडल्या होत्या.
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांचं काल निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 2 सप्टेंबर रोजी त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता, यानंतर त्यांना मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून भाषेच्या सीमा ओलांडल्या होत्या. त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीतही लिखाण केलं होतं. किरण नागरकर यांचा जन्म 1942 मध्ये झाला होता. तर 1974 मध्ये त्यांची 'सात सक्कं त्रेचाळीस' ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली होती. यानंतर 1997 मध्ये त्यांनी 'ककल्ड' ही कादंबरी लिहिली, ज्यासाठी त्यांना 2001 मधील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. किरण नगरकर यांच्या कादंबऱ्या -सात सक्कं त्रेचाळीस - गॉड्स लिटिल सोल्जर - रावण अँड एडी - द एक्स्ट्राज - रेस्ट इन पीस - द आर्सेनिस्ट नाटक - बेडटाईम स्टोरी - कबीराचे काय करायचे - स्ट्रेंजर अमंग अस - द ब्रोकन सर्कल - द विडो ऑफ हर फ्रेंड्स - द एलिफंट ऑन द माऊस - ब्लॅक ट्यूलिप