Marathi Serial : ओटीटी माध्यमाने स्वत:चा वेगळा ठसा उमटवला असला तरी मराठी मालिकांचादेखील एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. आजही कित्येक घरात संध्याकाळी 7 वाजता टिव्ही लावली जाते ती रात्रीपर्यंत सुरूच असते. घराघरांत उत्साहाने मालिका पाहिल्या जातात. आता याच मालिकांमध्ये रंजक वळणे येणार आहेत. येत्या रविवारी प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग रंगणार आहेत.


माझी तुझी रेशीमगाठ : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा आज एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या मालिकेत यश आणि नेहाचं नातं बहरताना दिसत आहे. आजच्या भागात परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करायला यशचा इंटरव्ह्यू घेताना दिसणार आहे. परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.


तू तेव्हा तशी : 'तू तेव्हा तशी' या मालिकेचे प्रेक्षक गेले अनेक दिवस आतुरतेने वाट पाहत आहेत. आजपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


आई कुठे काय करते : 'आई कुठे काय करते' या मालिकेत आजच्या एक तासाच्या विशेष भागात अरुंधतीच्या घरात चोर शिरणार आहे. पण हा चोर दुसरा तिसरा कुणी नसून, स्वतः अनिरुद्ध असणार आहे. आता अनिरुद्धचा अरुंधतीच्या घरात चोरपावलांनी शिरकाव करण्यामागचा नेमका हेतू काय असणार आहे, हे लवकरच प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.  


ठिपक्यांची रांगोळी : 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेचादेखील आज एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. आजच्या भागात नेहमी एकत्र असणारं कानिटकर कुटुंब वेगळं होणार आहे. त्याला कारण कुक्की असणार आहे. कुक्कीची बाहेरगावी बदली झाल्यामुळे कानिटकर कुटुंब वेगळं होणार आहे. 


संबंधित बातम्या


World Tv Premiere : 'पुष्पा- द राइज' आणि '83'चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले


Bhavana Menon : पाच वर्षांपूर्वी अत्याचाराला बळी, आता केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha