Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) कितीही राडे झाले, भांडणं झाली तरीही या घरात हिंसा करण्याची कुणालाही परवानगी नाही. जर बिग बॉसच्या घरात कोणत्याही स्पर्धकाने हिंसा केली तर त्याला थेट घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो. असंच काहीसं बिग बॉसच्या घरात घडलं आहे.
बिग बॉसच्या घरात वादाचं टोक गाठलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज कॅप्टन्सीचा टास्क पार पडणार आहे. या टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. 'बिग बॉस मराठी'च्या घरात अशा प्रकारचं कृत्य अमान्य आहे. बिग बॉसदेखील याचा निषेध करतात.
बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
कॅप्टन्सीवरुन आर्या आणि निक्कीची जोरदार जुंपली आहे. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नेमकं काय घडलं?
कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या नव्या कॅप्टन्सी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा ताई, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्याच्या झटापटीत आर्या व निक्की यांच्यात जोरात जुंपली. निक्की आणि आर्याच्या या भांडणाचे रूपांतर नंतर झटापटीत आणि त्यानंतर कानफटीत खेचण्यापर्यंत झाले. बिग बॅास यांनी आर्याच्या या कृत्याचा निषेध केला असून यात तिला काय शिक्षा होईल , हे उद्याच्या भागात कळेलच.
आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्यानंतर निक्की 'बिग बॉस'ला सांगत आहे की,"आर्याने मला मारलंय.. मी हे सहन करू शकत नाही". त्यावर आर्या म्हणतेय,"मला काही घेणं देणं नाही. मला जेल मध्ये पाठवा नाहीतर घरी पाठवलं तरी चालेल".