Anupamaa Spoiler: छोट्या पडद्यावरील अनुपमा (Anupamaa) या शोमध्ये सध्या डिंपल आणि समर यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. डिंपी आणि समर यांचे  शाह हाऊसमध्ये लग्न होणार आहे. डिंपल आणि समर यांच्या लग्नात खूप ड्रामा पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये  कांताबाई आणि लीला यांच्यात वाद होतात. जाणून घेऊया आगामी एपिसोडमध्ये कोणता नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.


अनुपमा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये डिंपलची आई अनुपमाला सांगते की, एक आई ही तिच्या मुलीला आधार देते आणि तिच्या मुलीसाठी सगळ्या जगाशी लढते, तू देखील तेच केले आहेस. अनुपमाने डिंपलला आपली मुलगी म्हणून स्वीकारलेच नाही तर तिच्यासाठी संघर्षही केला आणि आता  हुंडा न घेता तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर डिंपलची आई म्हणाली की, समर आणि डिंपी यांच्यामध्ये अनुज आणि अनुपमा यांच्या इतकेच प्रेम असावे अशी तिची इच्छा आहे.


 दरम्यान, डिंपलची आई म्हणते की, मी आता निघते. पण अनुपमा डिंपलच्या आईला म्हणाली की, तुम्ही मुलीची आई  आहात, त्यामुळे तुम्ही कन्यादान करावे. हे ऐकून डिंपल आणि तिच्या आईला खूप आनंद होतो.






डिंपल आणि समर यांच्या लग्नात होणार गुरुमाची एन्ट्री


डिंपल आणि समर यांच्या लग्नाच्या सर्व विधींमध्ये अनुपमा उत्सुकतेने दरवाजाकडे बघताना दिसते. मग काव्या अनुपमाला विचारते, ' काय झालं?' यावर अनुपमा सांगते की, तिने गुरुमाला लग्नासाठी आमंत्रित केले होते, पण गुरुमा येईल असे तिला वाटत नाही. मग गुरुमा यांना नकुल घेऊन येतो. गुरुमाला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. 






अनुपमा (Anupamaa) या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Anupamaa Spoiler Alert:  समर आणि डिंपल यांच्या लग्नात लीला आणि कांतामध्ये होणार वाद; अनुपमा मालिकेत काय घडणार? जाणून घ्या...