Anupama Serial Latest Update : 'अनुपमा' (Anupama) मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. सध्या मालिकेत समर आणि डिंपलच्या लग्नसोहळ्याचा ट्रॅक सुरू आहे. पण या लग्नसोहळ्यादरम्यान वेगवेगळे ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न निर्माते करत आहेत. मालिकेच्या आगामी भागात अनुपमा मायाला सडेतोड उत्तर देताना दिसणार आहे. 


रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) 'अनुपमा' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेतील समर आणि डिंपलच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता मालिकेच्या आगामी भागात एकीकडे समर आणि डिंपल लग्नबंधनात अडकणार आहेत. तर दुसरीकडे अनुपमा आणि मायामध्ये वाद होणार आहेत. 


'अनुपमा' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? (Anupama Serial Todays Episode Update)


'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात अनुज अनुपमाचा गृहप्रवेश करताना दिसणार आहे. अनुपमाला कपाडिया हाऊसमध्ये प्रवेश करताना संकोच वाटत असल्याने ती बाहेरच उभी असते. त्यावेळी अनुज तिला समजावतो आणि गृहप्रवेश करण्यास सांगतो. तो म्हणतो की,"अनुजची प्रत्येक गोष्ट ही कायम अनुपमाची असेल". अनुजच्या या बोलण्याने अनुपमालादेखील आनंद होतो. घरात प्रवेश केल्यानंतर अनुपमा सर्वात देवाचा आशीर्वाद घेते. 


अनुपमा मायाला देणार सडेतोड उत्तर


'अनुपमा' मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना पुढे पाहायला मिळेल की,  अनुपमा आण अनुजचं बोलणं माया ऐकते आणि त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करते. माया अनुजला ती भटजीकडे पाठवते अनुपमाला म्हणते,"मी तुझी जागा घेतल्यामुळे तुला वाईट वाटत आहे का?". त्यावर अनुपमा म्हणते की,"आज माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते फक्त तुझ्यामुळे... त्यामुळे काय चांगलं काय वाईट हे तू मला शिकवू नकोस. माझ्यावर लक्ष ठेवायला माझा देव आहे". 






समर आणि डिंपल अडकणार लग्नबंधनात


'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात समर आणि डिंपल अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी अनुजने खूप खर्च केला आहे. मालिकेच्या आगामी भागात डिंपलच्या आईची एन्ट्री होणार आहे. आता डिंपलच्या आईची भूमिका नक्की कोणती अभिनेत्री साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागेल. 


संबंधित बातम्या


Anupama : 'अनुपमा' रंजक वळणावर; काव्या वनराजला देणार गुडन्यूज!