Ankita Lokhande Pregnancy Rumors : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे हे घराघरांत पोहोचलेलं नाव आहे. पवित्र रिश्ता टीव्ही मालिकेमुळे अंकिताचं नाव देशभरात पोहोचलं आहे. अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये दिसत आहे. यादरम्यान, आता अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्री लवकरच गूड न्यूज देणार असल्याची चर्चा रंगली आहे. लाफ्टर शेफ शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावरुन अंकिता लोखंडे गूड न्यूज देणार असल्याचं बोललं जात आहे.


अंकिता लोखंडे देणार गूड न्यूज?


'लाफ्टर शेफ' हा शो नसून प्रेक्षकांचा आवडता कॉमेडीश शो ठरताना दिसत आहे. या शोमध्ये भारती सिंह, अंकिता लोखंडे, तिचा पती विकी जैन, निया शर्मा, अर्जुन बिजलानी आणि करण कुंद्रा या सेलिब्रिटींचा समावेश आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये, अंकिता लोखंडे पोट दुखत असल्याची तक्रार करत आहे, पण यावेळी इतरांनी तिच्या शब्दांना अतिशयोक्ती देत, ही प्रेग्नेंसीची लक्षणं असल्याचं म्हटलं आहे. 


अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याची चर्चा


लाफ्टर शेफच्या नवीन प्रोमोनुसार, लाफ्टर शेफ शोमध्ये  मुनावर फारुकी पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. प्रोमोच्या सुरुवातीला विकी जैन अंकिता लोखंडेला विचारतो की, ती ठीक आहे का? यावर उत्तर देताना, ती पोटात दुखत असल्याची तक्रार करते. तिचं पोट दुखत असल्याचं पाहून सर्वजण तिच्याभोवती गोळा होतात. मुनव्वर फारुकी म्हणतो, 'तिला चक्कर आली आणि ती पडली. चांगली बातमी आहे का?' दरम्यान, अली गोनीनं तिने पाय जड झाल्याची म्हणजेच ती प्रेग्नेंट असल्याची उपरोधिक टीका केली.


लाफ्टर शोचा नवीन प्रोमो






अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसीवर पुन्हा चर्चा


यावेळी अर्जुन बिजलानी, भारती सिंह, रीम शेख आणि इतर स्टार्स हा क्षण साजरा करताना नाचू लागतात. त्यानंतर विकी जैनने अंकिताच्या कपाळावर किस केल्याचं दिसत आहे. यानंतर विकी लवकरच बाप होणार, असं म्हणत कृष्णा तिला चिडवतो की. दरम्यान, अंकिता आणि विकीने प्रेग्नेंसीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.