Akshaya Deodhar:  'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांना विशेष लोकप्रियता मिळाली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अक्षया आणि हार्दिक हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच अक्षयानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयाच्या हातावर मेहंदी काढलेली दिसत आहे.


अक्षयानं शेअर केला व्हिडीओ


अक्षयाची यंदा पहिली मंगळागौर आहे. त्यानिमित्तानं अक्षयानं तिच्या हातावर मेहंदी काढली आहे. या मेहंदीमध्ये 'अक्षयाची मंगळागौर' असं लिहिलेलं दिसत आहे. व्हिडीओमध्ये अक्षया ही पर्पल कलरच्या आऊटफिमध्ये दिसत आहे. अक्षयानं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'मंगळागौर' असं लिहिलं आहे. तसेच तिनं मेहंदी स्पेशल असा हॅशटॅग या व्हिडीओला दिला आहे. अक्षयाच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.






काही दिवसांपूर्वी अक्षया आणि  हार्दिक यांनी जेजुरीच्या खंडोबाचं (Jejuri Khandoba Temple) दर्शन घेतलं.हार्दिक जोशीने सोशल मीडियावर जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.






2 डिसेंबर 2022 रोजी  हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांनी तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम केलं. या मालिकेमध्ये अक्षयानं पाठकबाई ही भूमिका साकारली तर हार्दिकनं या मालिकेत राणादा भूमिका साकारली होती. या दोघांचा चाहता वर्ग मोठा आहे. अक्षयाला इन्स्टाग्रामवर  1.4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत तर हार्दिकला इन्स्टाग्रामवर 360k फॉलोवर्स आहेत. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Akshaya Deodhar: लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अक्षयानं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, 'मी तयार नव्हते'