टीनाने फेसबुरवर लिहिलं आहे की, "जेट एअरवेजच्या विमानात सहप्रवाशाने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. सहप्रवाशाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची तक्रार मी क्रू-मेंबर्सकडे केली. परंतु स्टाफने माझी कोणतीही मदत केली नाही. कारवाई म्हणून जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रूने फक्त माझी सीट बदलली."
टीना पुढे लिहिते, "सुरुवातीला विमानाच्या कॅप्टनशी मला बोलू दिलं नाही. कसंतरी कॅप्टशनची बोलणं झालं, पण त्याने सांगितलं की, संबंधित घटना आमच्या प्रोटोकॉलमध्ये येत नाही. जेट एअरवेजसाठी माझ्याकडे काही गंभीर प्रश्न आहेत. तुमच्याकडे सुरक्षेचे काही नियम आहेत का? माझ्यासोबत अतिशय चुकीची घटना घडली. सीट बदलण्याशिवाय दुसरी कोणतीही कारवाई केली नाही. मला जेट एअरवेजकडून अशी अपेक्षा नव्हती."
टीना दत्ताची फेसबुक पोस्ट