मुंबई: अभिनेत्री अमृता राव ही महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीच्या बरीच प्रेमात पडली आहे. 'मेरी आवाज ही पहचान है' या मालिकेतील सहकलाकार पल्लवी जोशीनं सगळ्यानाच मराठमोळ्या जेवणाची मेजवानी दिली.


 

या मेजवानी बद्दलच अभिनेत्री अमृता राव हिने पल्लवी जोशीचे आभार मानले. या मालिकेत दोन मराठी कलाकार असल्यानं सेटवर बऱ्याचदा महाराष्ट्रीयन पदार्थांची रेलचेल असते.

 

पल्लवी नेहमीच सेटवर घरुन बनंवलेलं जेवण घेऊन येते. त्यामुळे येथील इतर कलाकारांनाही ती मराठी पदार्थ खाऊ घालते.

 

पल्लवीनं दिलेल्या मेजवानीनंतर अमृतानं सांगितलं की, 'सेटवर सगळेच खाण्याचे शौकिन आहेत. महाराष्ट्रीयन पदार्थांमुळेच आमची मैत्री झाली आहे. ही गोष्ट फारच चांगली आहे की, पल्लवी आमच्यासाठी नेहमीच खास जेवण घेऊन येते.'