मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची 'बलिए' तृप्ती जाधव यांच्या 'झिंगाट' परफॉर्मन्सनं नच बलिएच्या परीक्षकांसह सर्व चाहत्यांना याड लावलं होतं. मात्र या मराठमोळ्या जोडीला 'नच बलिए'च्या मंचाचा निरोप घ्यावा लागला आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील नच बलिए या डान्स रिअॅलिटी शोच्या यंदाच्या पर्वात सिद्धार्थ-तृप्तीच्या जोडीनं डान्सिंग सुपरस्टार हृतिकलाही 'पिंगा' घालायला लावला. ही जोडी सचिन-सुप्रिया, अमृता खानविलकर या मराठमोळ्या विजेत्यांचा इतिहास पुन्हा गिरवेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र प्रेक्षकांसोबतच त्यांच्या स्वप्नांनाही विराम मिळाला आहे.

सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव नच बलिएतून बाद झाले आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीच्या पहिल्याच परफॉर्मन्सने मंचावर धूम केली होती. त्यामुळे या जोडीकडून अनेकांना अपेक्षा होत्या. मात्र त्यांचा हा प्रवास इथेच थांबला.

नच बलिएच्या पहिल्या पर्वात दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी विजेतेपद पटकावलं होतं. तर गेल्या पर्वात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि पती हिमांशूच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली होती.

मराठी रंगभूमी असो, सिनेमा असो किंवा हिंदी कॉमेडी शोज, सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गोलमाल रिटर्न्स चित्रपटातही सिद्धार्थने भूमिका साकारली आहे.

केवळ प्रेक्षकच नाहीत, तर स्वत: सिद्धार्थ आणि तृप्तीही या शोसाठी खूपच उत्सुक होते. दमदार परफॉर्मन्ससाठी दोघांनी प्रचंड मेहनतही घेतली. सिद्धार्थ-तृप्तीची या शोमधून एक्झिट झाली असली, तरी यानिमित्ताने या जोडीची केमिस्ट्रीही चाहत्यांना पाहता आली, हेही नसे थोडके.

संबंधित बातम्या :


'पिंगा'वर सिद्धार्थने साडी नेसून हृतिकला नाचवलं!


‘नच बलिये’च्या मंचावर सिद्धार्थ जाधवचा बायकोसोबत जलवा!