Mahesh Babu : साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) सध्या प्रचंड चर्चेत आहे. सध्या अभिनेता आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असला तरी, सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी कनेक्टेड राहतो. मात्र, आता महेश बाबू चर्चेत येण्याचं कारण आहे त्याची लेक सितारा (Sitara). सध्या अभिनेता महेश बाबू आणि त्याची लेक सितारा यांचा एक डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही धमाल डान्स करताना दिसले आहे. हा व्हिडीओ तेलुगू ‘डान्स इंडिया डान्स’च्या (Dance India Dance Telugu) मंचावर चित्रित करण्यात आला आहे.


अभिनेता महेश बाबू, चित्रपट निर्माता त्रिविक्रमसोबत त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच तेलुगू स्टार 'डान्स इंडिया डान्स तेलुगू' या रिअॅलिटी शोच्या सेटवर दिसला होता. यावेळी महेश बाबूसोबत त्यांची मुलगी सितारा घट्टामनेनीही उपस्थित होती. यावेळी महेश बाबूची मुलगी सितारानेही 'डान्स इंडिया डान्स तेलुगू'च्या मंचावर डान्स केला. आता महेश आणि सिताराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


पाहा व्हिडीओ



सिताराही महेश (Mahesh Babu) प्रमाणेच उत्तम डान्सर आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर महेश बाबूचे कौतुकही केले जात आहे. त्याने आपल्या मुलीला स्टारकीडसारखी नाही, तर सामान्य मुलांप्रमाणेच वाढवले आहे, असे चाहते म्हणत आहेत. ‘डान्स इंडिया डान्स तेलुगू’च्या आगामी एपिसोडच्या प्रोमो व्हिडीओमध्ये महेशसोबत त्याची लेक सिताराही दिसत आहे. दोघांना एकत्र पाहून चाहते देखील उत्साहित झाले आहेत.


महेश आणि सितारा ‘डान्स इंडिया डान्स तेलुगू’च्या रेड कार्पेटवर एकत्र दिसले आणि चाहत्यांनाही भेटले. महेश बाबूच्या मुलीनेही सेटवर इतर स्पर्धकांसोबत डान्स केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश बाबूने 'डान्स इंडिया डान्स तेलुगू'च्या सेटवर येण्यासाठी तब्बल 9 कोटी रुपये फी घेतली आहे.


‘परफेक्ट फॅमिली मॅन’


अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) परफेक्ट ‘फॅमिली मॅन’ आहे. महेश नेहमी आपल्या मुलांसोबत आणि पत्नीसोबत वेळ घालवताना दिसतो. सोशल मीडियावरही तो कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. यामुळेच अभिनेत्याला ‘परफेक्ट फॅमिली मॅन’ असेही म्हटले जाते. महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर देखील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण, सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबाला संपूर्ण वेळ देत आहे. दोघांची पहिली भेट 2000साली ‘वामसी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघे प्रेमात पडले. 2005 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.