Abhijit Kelkar: गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार राजकारणामध्ये एन्ट्री करत असल्याचं पहायला मिळत आहे. आता बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत केळकरनं (Abhijit Kelkar)  भाजपमध्ये (BJP)  केला प्रवेश आहे. नुकतीच एक पोस्ट शेअर करुन अभिजीतनं याबाबत माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


अभिजीत केळकरनं राजकारणात एन्ट्री केली आहे. त्यानं भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) या पक्षात प्रवेश केला आहे. अभिजीत केळकरनं चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule)  आणि  प्रिया बेर्डे (Priya Berde) यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश,   As they say, you have to be in the system to change it... किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची? त्या प्रवाहात सामिल होऊन, समजून घेऊन, काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.'


अभिजीत केळकरनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिजीत केळकरसोबतच  'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री मेघा धाडेनं (Megha Dhade)  देखील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. अभिनेता सौरभ गोखले यानं देखील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. 






अभिजीत केळकरचे चित्रपट


तीचा बाप त्यचा बाप (2011), कधी आचानक (2006), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), बालगंधर्व यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच बिग बॉस मराठी या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. तसेच अभिजीत केळकरनं काही मालिकांमध्ये देखील काम केलं होतं. ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या मालिकेत त्यानं  बालगंधर्व यांची भूमिका साकारली होती. अभिजीतच्या आगामी मालिकांची तसेच चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


अभिजीत हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर त्याला  32.3k फॉलोवर्स आहेत. अभिजीत हा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Megha Dhade: 'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; भाजपामध्ये केला प्रवेश