Kaun Banega Crorepati: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा  15 (Kaun Banega Crorepati 15) वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. इतर सीझन प्रमाणेच केबीसीच्या या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. केबीसी या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर येथील रहिवासी आनंद राजू यांनी सहभाग घेतला. त्यांना 25 लाखाच्या बक्षीसासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का?


अमिताभ बच्चन यांनी आनंद राजू यांना 25 लाख रुपयांच्या बक्षीसासाठी प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की,'रुडयार्ड किपलिंग यांचे घर 'नौलाखा' जिथे त्यांनी जंगल बुक लिहिले होते, ते कोणत्या देशात आहे?


अमिताभ बच्चन यांनी  आनंद राजू यांना चार पर्याय दिले. होते-


A अमेरिका


B पाकिस्तान


C ब्रिटन


D श्रीलंका


 अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर आनंद यांना माहित नव्हते त्यामुळे त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. आनंद यांच्याकडे तीन लाइफलाइन देखील होत्या. हा  लाइफलाइन्सचा वापर करुनही आनंद यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.




12 लाख पन्नास हजारांची रक्कम जिंकल्यानंतर आनंद राजू यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, या प्रश्नाचं उत्तर  ऑप्शन ए म्हणजेच अमेरिका आहे. शोमध्ये आलेल्या आनंद यांनी सांगितले की, त्यांना बालपणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.  






अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. बिग बींचा प्रोजेक्ट-के हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Kaun Banega Crorepati 15: 'या' प्रश्नामुळे हुकली राहुल नेमा यांची 'करोडपती' होण्याची संधी; तुम्ही देऊ शकाल का उत्तर?