Aai Kuthe kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली असून आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. 


'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या इशा आणि अनिशच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. इशाने अनिरुद्धला घाबरुन अनिलसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण इशाने असं चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी अरुंधतीने त्या दोघांचा साखरपुडा करुन दिला. 


अनिशचे आई-बाबा येणार म्हणून अनिरुद्ध चिडला


अनिशचे आई-बाबा आता केळकरांच्या घरी आले असून त्यांनी देशमुखांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता अनिशचे आई-बाबा येणार म्हणून अनिरुद्ध चिडलेला दिसणार आहे. इशासाठी अनिश योग्य मुलगा नसल्याचं तो घरच्यांना सांगणार आहे. इशा आणि अनिशच्या नात्याबद्दल घरातील सर्व मंडळी आनंदी असली तरी अनिरुद्धला मात्र आनंद झालेला नाही. 






अनिशचे आई-बाबा येणार असल्याने इशा मात्र गोंधळली आहे. लग्नासाठी मानसिक तयारी न झाल्याचं इशा घरच्यांना सांगते. दरम्यान संजना आणि अनघा तिला समजावतात. तर दुसरीकडे अनिशलादेखील लग्नाचं दडपण आलं आहे. आता साखरपुड्यानंतर अनिशने करिअरवर फोकस ठेवला आहे. तसेच इशानेदेखीस संसार थाटण्याआधी करिअर बनवावं अशी अनिशची इच्छा आहे. 


अनिशच्या आई-बाबांना भेटण्यासाठी अनिरुद्ध तयार नाही. त्यांना भेटण्यासाठी तो विरोध करणार आहे. अनिश आणि इशाचं लग्न मान्य नसल्याचं तो सर्वांना सांगणार आहे. तसेच अनिशचं इशावर प्रेम नसून तो लग्नाचं नाटक करत असल्याचं अनिरुद्ध घरच्यांना सांगणार आहे. अनिरुद्धचा हा तमाशा पाहिल्यानंतर इशा काय प्रतिक्रिया देणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 


'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार? 


'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचं नाव वीणा असं आहे. वीणा येणार असल्याने आशुतोषला अनेक शंका उपस्थित होत आहेत. वीणा सुलेखा ताईंना काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. सुलेखा ताईंचा वीणावर खूप जीव होता. त्यामुळे आता वीणाच्या परत येण्याने सुलेखा ताईंना खूप त्रास होणार आहे. 


संबंधित बातम्या


Milind Gawali: 'एका बापाची व्यथा...' ; आई कुठे काय करते मालिकेमधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष