Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. अजूनही या मालिकेची क्रेझ कमी झालेली नाही. आता या मालिकेत एक ट्वीस्ट येणार आहे. मालिकेच्या आगामी भागात आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार?
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचं नाव वीणा असं आहे. वीणा येणार असल्याने आशुतोषला अनेक शंका उपस्थित होत आहेत. वीणा सुलेखा ताईंना काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. सुलेखा ताईंचा वीणावर खूप जीव होता. त्यामुळे आता वीणाच्या परत येण्याने सुलेखा ताईंना खूप त्रास होणार आहे.
वीणा घरी येत असल्याची चर्चा आशुतोष, नितीन आणि अरुंधती करत असतात. त्यांचं बोलणं सुलेखा ताईंच्या कानावर पडतं आणि त्यांना खूप आनंद होतो. पण आशुतोष आणि अरुंधती सुलेखा ताईंना समजावतात की, वीणाच्या वाटेकडे डोळे लावून बसू नको.
एकीकडे वीणाच्या येण्याने आशुतोष आणि अरुंधती चिंतेत आहेत. तर दुसरीकडे परीक्षा न देता आल्यामुळे ईशा स्वत:ला थोडाबीत मारते. दरम्यान यश तिला शांत करतो आणि पुन्हा परीक्षा देण्याचा सल्ला देतो. परीक्षा देऊ न शकल्यामुळे ईशाला भीती वाटते की, बाबा तिला ओरडतील आणि अनिशचे आई-बाबा त्यांच्या लग्नासाठी तिला नकार देतील.
ईशाला कॅनडाला जाण्यापासून अरुंधती रोखू शकेल?
यश आणि ईशाचं बोलणं अनिरुद्ध ऐकतो. त्यानंतर तो ईशाला खूप ओरडतो आणि तिला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतो. दरम्यान यश अरुंधतीला फोन करुन घडला प्रकार सांगतो. त्यानंतर अरुंधती घरी येत ईशा कुठेही जाणार नाही, असं ठणकावून सांगते. मालिकेत लवकरच ईशा आणि अनिशचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या