Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काही दिवसांपूर्वी आशुतोषच्या मानलेल्या बहिणीची एन्ट्री झाली आहे. या बहिणीचं नाव वीणा असं आहे. वीणा ही गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्धवर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे आशुतोषला वीणाबाबत काळजी वाटत आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या या प्रोमोमध्ये दिसत आहे की,सुलेखा या आशुतोषला विचारतात की, 'वीणा अजून इथेच आहे की निघून गेली आहे, याचा विचार करत आहेस का तू?'. तर आशुतोष नाही असं उत्तर देतो. त्यानंतर अरुंधती ही सुलेखा यांना सांगते, 'मला सकाळी त्यांनी विचारलं वीणा कुठे आहे?' सुलेखा या अशुतोषला म्हणतात, 'ती कामासाठी बाहेर गेली आहे पण घरी परत येते असं सांगून गेली आहे. '
वीणा आणि अनिरुद्ध यांच्याबाबत आशुतोष आणि अरुंधती यांच्यामध्ये चर्चा होते. अरुंधती ही आशुतोषला म्हणते, 'अनिरुद्ध यांनी काय जादू केली आहे माहित नाही? पण वीणाला अचानक त्यांच्याविषयी सहानभुती वाटतं आहे, तुम्ही याबद्दल वीणासोबत बोला' यावर आशुतोष अरुंधतीला म्हणतो, 'बोलेन, खूप उशीर होण्याआधी बोललं पाहिजे.'
त्यानंतर ईशा आणि यश यांच्यामध्ये देखील वीणा आणि अनिरुद्ध यांच्याबद्दल चर्चा होते. अनिरुद्ध आणि वीणामध्ये काही सुरु आहे का?, अशी शंका ईशा ही यश समोर व्यक्त करते. पण यश ईशाला वीणा आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये काहीही नसेल, असं समजवतो.
'आई कुठे काय करते' मालिकेत वीणाची एन्ट्री झाल्याने मालिकेत रंजक वळण आलं आहे. वीणाचा वापर करुन अनिरुद्ध आशुतोषच्या आणि अरुंधतीच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत आहे याचा अंदाज अरुंधतीला आला आहे. त्यामुळे वीणाच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यात काय ट्विस्ट येणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aai Kuthe Kay Karte : वीणा अनिरुद्धवर ठेवतेय विश्वास; पाहा 'आई कुठे काय करते !' मालिकेचा प्रोमो