Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आई कुठे काय करते मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.


मधुराणी यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन मधुराणी यांनी चाहत्यांना काही टीप्स दिल्या आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'मित्र मैत्रिणींनो, प्रचंड उन्हाळा आहे ... आणि त्यातही घराबाहेर पडून आपली कामं करत राहणं तर भाग आहे. अशावेळी ताक, नारळपाणी , सरबत पीत राहून आपली काळजी घ्यायची. तुम्हीही स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घेत रहा'


मधुराणी यांनी शेअर केलेल्या या फोटोला देखील अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'हो मधुराणी, घेतोय काळजी आम्हाला तर भर उन्हात दुपारच्या (1 pm to 8 pm) ड्युटीला जावं लागतं त्यामुळे गाॅगल,छत्री, सनकोट, पाण्याची बाटली ताक किंवा सरबत सोबत असतच शिवाय साखरेच्या गोळ्या अन् चिंचेच्या गोळ्या पण असतात.'  तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तुम्ही पण काळजी घ्या' 






 मधुराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करतात. मधुराणी या त्यांच्या मुलीसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतात.  इन्स्टाग्रामवर त्यांना 241K  फॉलोवर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मधुराणी यांनी अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे. आई कुठे काय करते या  मालिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते  मिलिंद गवळी हे साकारतात. तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Madhurani Prabhulkar: आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाल्या, 'मोस्ट फेव्हरेट...'