Anand Shinde and Sharad Pawar Meeting :  अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election 2024) बरेच जण इच्छुक आहेत. पक्षातच असलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे आता आमदारकीसाठी प्रयत्न करतायत. यामध्ये कलाकारही कुठे मागे नसल्याचं चित्र सध्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आलेली आहे.


आनंद शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून आनंद शिंदे त्यांचा मुलगा उत्कर्ष शिंदेच्या उमेदवारीसाठी आग्रह असल्यच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्याचप्रमाणे आनंद शिंदे यांनी मोहोळ, शिर्डी किंवा दक्षिण सोलापुरमध्ये उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे आता शिंदे घराणं जर राजकारणाच्या वर्तुळात आलं तर निवडणुकीच्या रिंगणात स्वत: आनंद शिंदे उतरणार की उत्कर्षसाठी आग्रह धरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष


दरम्यान आनंद शिंदे आग्रही असलेल्या मतदारसंघामध्ये शरद पवारांची ताकद आहे. त्यामुळे मोहोळ, शिर्डी आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून आनंद शिंदे हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जातंय. यावर आता शरद पवार काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.                                                                                               


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं


मागच्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींमुळे यंदाची विधानसभा निवडणुक ही अनेकांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर निकाल लागणार आहे. 


दरम्यान सध्या प्रत्येक राजकीय पक्षाकडून आता सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून जोरदार प्रचार देखील सुरु झालाय. नुकतीच भाजपने त्यांच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आता कोणत्या उमेदवारांना यंदाच्या विधानसभेसाठी संधी मिळणार याची उत्सुकता आहे.     



ही बातमी वाचा : 


Prabhas Birthday: 'बाहुबली'फेम सुपरस्टार प्रभासच्या 'या' चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड केलीये कमाई