Television Star Struggl Life: आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण स्वप्नांची नगरी मुंबईत (Mumbai News) येतात. कुणी आपलं ठरवलेलं लक्ष्य गाठतं, तर कुणाच्या वाटेत मात्र खूप काटे येतात. आज आम्ही अशाच एका अभिनेत्याबाबत (Television Actor) सांगणार आहोत, जो आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला खरा, पण त्याला रेल्वे स्टेशनवरच राहावं लागलं. पण, आज त्यानं मेहनतीनं मुंबईत चार घरं घेतली आहेत. एकेकाळी त्याला त्याच्या पहिल्या नोकरीतून 95 रुपये आणि पेन विकून 150 रुपये मिळाले होते. पण, आज तो वर्षाकाठी कोट्यवधींची कमाई करतो. 

Continues below advertisement


अभिनेत्याच्या संघर्षाची कहाणी ऐकलीत, तर तुमच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावतील. त्याची सध्याची जीवनशैली आणि कमाई ऐकलीत तर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही. 


अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला, रेल्वे स्टेशनवर राहू लागला; अन्... 


उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशीच्या राठ शहरात राहणाऱ्या या अभिनेत्याच्या कुटुंबातील प्रत्येकजण अध्यापन क्षेत्रात आहे, पण त्यानं वेगळी वाट निवडत अभिनयात करिअर करण्याचा विचार केला. कुटुंबाच्या विरोधात जाऊन तो मुंबईत आला आणि नंतर संघर्ष करत राहिला. त्याच्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती, म्हणून तो रेल्वे स्टेशनवर राहिला आणि तिथे रात्री घालवली. आज परिस्थिती अशी आहे की, तो वर्षाकाठी 2,88,00,000 रुपये कमवतो आणि मुंबईत त्याची चार मोठी घरं देखील आहेत. 


दरवर्षी अनेक नवे चेहरे त्यांचं स्थान शोधण्यासाठी मुंबई मायानगरीमध्ये येतात. काहींना फक्त हिरो बनायचं असतं, तर काहींना अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमानसारखं नशीब हवं असतं. असाच एक कलाकार हमीरपूरच्या राठ इथून आलेला, जो वयाच्या 23 व्या वर्षी घर सोडून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला पोहोचला.


आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत, त्याचं नाव योगेश त्रिपाठी. ज्याला आज सर्वजण हप्पू सिंह म्हणून ओळखतो. 'भाभीजी घर पर हैं!' आणि 'हप्पू की उलटन पलटन' सारख्या शोमुळे योगेश त्रिपाठी एक मोठा स्टार बनला. खऱ्या आयुष्यातही लोक त्याला योगेश त्रिपाठीपेक्षा हप्पू सिंह म्हणून जास्त ओळखतात.


योगेश त्रिपाठी मुंबईत येऊन 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि आज तो अशा पदावर आहे की, तो अभिनयातून महिन्याला 24 लाख रुपये कमवतो. त्याची एका वर्षातली कमाई 2,88,00,000 रुपये आहे.


रंगभूमीपासून सुरुवात, मग पहिली संधी कधी मिळाली? 


योगेश त्रिपाठीनं सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, त्यांनी मुंबईत आल्यानंतर रंगभूमीपासून सुरुवात केली. पण त्याआधी ते रेल्वे परीक्षेची तयारी करत होते. या संदर्भात, जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा त्यांनी ट्रेनच्या जनरल डब्यात वॉश बेसिनजवळ 18 तास उभे राहून प्रवास केला. त्यानंतर 2004 मध्ये ते कायमचे मुंबईत आले, पण 2007 मध्ये एका जाहिरातीतून त्यांना पहिला ब्रेक मिळाला.


योगेश त्रिपाठी यांनी सांगितलेलं की, त्यांना पहिला ब्रेक मिळेपर्यंत त्यांनी मुंबईत जगण्यासाठी छोटी-छोटी कामं केली. जेणेकरून ते त्यांचे खर्च भागवू शकतील. त्यांनी 150 रुपयांना पेन विकले. एकदा त्यांनी 1500 रुपयांना बॅकग्राउंड अभिनेत्याची भूमिका केली. योगेश यांनी सांगितलेलं की, मुंबईत त्यांच्या पहिल्या कामासाठी त्यांना 95 रुपये आणि थिएटरमधून 75 रुपये मिळालेले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Actor Shreyas Raje On Ganeshotsav 2025: 'नाव शोएब.. पण गणेशोत्सवाबद्दलचा आदर खऱ्याहून खरा...", मराठमोळ्या अभिनेत्याची समाजाला आरसा दाखवणारी पोस्ट