Television Star Pamela Serena on Crickert Betting: 'लॉक अप 2' या रिअॅलिटी शोमधील स्पर्धक सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एलिमिनेशनपासून स्वत:ला सेफ करण्यासाठी स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सीक्रेट या शोमध्ये रिव्हिल करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आकांक्षा चमोला आणि राम कपूर हे दोघेही प्रचंड चर्चेत आले होते. अलिकडेच पामेला सेरेना आणि सूफी मोतीवाला यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे सीक्रेट उघड केले आहे. यामुळे त्यांना स्पर्धेत आपली जागा पक्की करण्याची संधी मिळाली आहे. तिनं स्टूडेंट असताना क्रिकेटवर सट्टा लावत असल्याचं सांगितलं.
पामेला सेरेना क्रिकेटवर सट्टा कशी लावत होती? (Television Star Pamela Serena on Crickert Betting on lock upp 2)
जेव्हा पामेला सेरेनाला तिच्या वैयक्तिक आयुष्यातील सिक्रेट रिव्हिल करण्यास सांगितले होते, तेव्हा तिला स्क्रिनवर 'मॅच फिक्सिंग' हा शब्द दिसला. हा शब्द वाचल्यानंतर अभिनेत्री थोडी घाबरली. मग तिनं सांगितलं की, जेव्हा ती स्टूडेंट होती, तेव्हा तिचा मित्र अनेक क्रिकेटपटूंच्या संपर्कात होता. त्या मित्राच्या माध्यमातून अभिनेत्रीला आतली माहिती मिळत होती. या माहितीच्या आधारे अभिनेत्री सट्टा लावत होती.
पामेला सेरेना 'लॉक अप 2' या शोमध्ये म्हणाली, 'जेव्हा मी विद्यार्थी होती. तेव्हा माझा एक मित्र होता. तो क्रिकेटर्सच्या अत्यंत जवळ होता, आणि त्याला टिप्स मिळायची की कोण जिंकणार आणि कोण स्कोअर करणार. ही माहिती थेट टीमकडून मिळायची. लंडनमध्ये बुकीज असतात, जिथे आपण जुगार खेळू शकतो, सट्टा लावू शकतो, पैज लावू शकतो. तर, त्यादिवशी मी टिप्स घेतली आणि मग सट्टा लावला. मी खूप पैसे कमावले. पण मला याचा अभिमान नाही' असं पामेला रिअॅलिटी शोमध्ये म्हणाली.
पामेलाने हेही स्पष्ट केलं की, लंडनमध्ये सट्टेबाजी बेकायदेशीर नाही. पामेलाने हे कबूल केले की, त्यावेळी तिला सट्टेबाजी करताना मजा येत होती, पण पैसे कमावण्याचा हा मार्ग चुकीचा आहे, असं तिला नंतर जाणवलं. पामेलाने सांगितलं की, 'मी तेव्हा लहान होती, स्टूडेंट होती. सहज पद्धतीने मिळणाऱ्या पैशांच्या मोहाकडे आकर्षित झाले होते, असं तिने सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
