The Odyssey Box Office Collection: 'जगप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या 'द ओडिसी' (The Odyssey) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत कमाईचे नवे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मॅट डेमन अभिनित या चित्रपटाला भारतातही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्याच्या जोरावर चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. (Box Office Collection)

Continues below advertisement

विकडेजमध्ये चित्रपटाच्या कमाईत किंचित घट झालेली. मात्र, वीकेंड सुरू होताच त्याच्या कमाईने पुन्हा वेग घेतला. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, देशभरातील 4,591 शो आणि चार भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शनिवारी, म्हणजेच प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी, 11.05 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला भारतात प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 

नवव्या दिवशी किती झाली कमाई?

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'द ओडिसी'ने नवव्या दिवशी 11.05 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचे देशभरात 4,591 शो प्रदर्शित झाले होते आणि त्याला 56 टक्के ऑक्युपन्सी मिळाली.

Continues below advertisement

 इंग्रजी: 3.40 कोटी रुपये हिंदी: 2.90 कोटी रुपये तामिळ: 85 लाख रुपये तेलुगू: 20 लाख रुपये

यासह भारतातील चित्रपटाची एकूण नेट कमाई 108.20 कोटी रुपये झाली आहे. तर ग्रॉस कलेक्शन 129.15 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

'द ओडिसी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

 पहिला दिवस: 17.40 कोटी दुसरा दिवस: 22.00 कोटी तिसरा दिवस: 21.90 कोटी चौथा दिवस: 8.00 कोटी पाचवा दिवस: 8.35 कोटी सहावा दिवस: 6.50 कोटी सातवा दिवस: 6.15 कोटी पहिल्या आठवड्याची एकूण कमाई: 90.30 कोटी आठवा दिवस: 6.85 कोटी नववा दिवस: 11.05 कोटी

या दमदार कामगिरीमुळे चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

'द ओडिसी' नेमका कशावर आधारित?

'द ओडिसी' हा ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित भव्य एपिक ॲक्शन फिल्म आहे. प्राचीन ग्रीक कवी होमर यांच्या प्रसिद्ध 'The Odyssey' या महाकाव्यावर हा चित्रपट आधारित आहे.चित्रपटात मॅट डेमन, टॉम हॉलंड, ॲन हॅथवे, झेन्डाया, रॉबर्ट पॅटिन्सन, लुपिता न्योंगो, शार्लीज थेरॉन, हिमेश पटेल आणि इलियट पेज यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 17 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा रनटाइम सुमारे 2 तास 55 मिनिटांचा असून, तो IMAX तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रित करण्यात आला आहे.