Shweta Tiwari on Cockroach Janta Party Post: नीट पेपरफुटीप्रकरणावरुन सुरू झालेल्या आंदोलनाला अखेर 25 जुलै रोजी यश मिळाले (Dharmendra Pradhan). कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janta Party) आणि आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Resignation) यांचा राजीनामा मागितला होता. त्यांनी 25 जुलै रोजी अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन मंत्रिपदाचा राजीनामा (Entertainment) सुपूर्द केला असल्याची माहिती दिली. धर्मेंद्र प्रधान (Shweta Tiwari) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियात नेते मंडळींसह (Abhijeet Dipke) सिने कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. अशातच प्रसिद्ध टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. तिनं अभिजीत दिपकेंसमोर एक प्रश्न उपस्थित केला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, अन् ही बातमी सोशल मीडियात वाऱ्यासारखी पसरली. या सगळ्यात अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ क्लिप शेअर केला आहे. तिनं या व्हिडीओ क्लिपमध्ये एक प्रश्न उपस्थित केला आहे. तिनं आपल्या प्रश्नातून थेट कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केला. सध्या श्वेता तिवारीची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
श्वेता तिवारी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना काय म्हणाली? (Shweta Tiwari on Cockroach Janta Partys Abhijeet Dipke)
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा जंतर मंतर येथील अभिजीत दिपकेंचा आहे. या व्हिडीओत अभिजीत दिपके, 'धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, आता योग्य काम न करणाऱ्या कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करु शकतो', असं म्हटले आहे. अभिजीत दिपकेंचा हाच व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने सवाल उपस्थित केला आहे. तिनं अभिजीत दिपकेंचा हा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये शेअर केला आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे.
श्वेता तिवारी म्हणाली, 'आता, पंजाबचे शिक्षणमंत्री कधी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत? आणि कॉकरोच जनता पार्टी, तुम्ही तिथे जाऊन कधी आंदोलन छेडणार आहात?', असा सवाल तिनं व्हिडीओ शेअर करत उपस्थित केला आहे. सध्या तिची इन्स्टाग्राम सोशल मीडियात व्हायरल होत आहे. श्वेता तिवारीच्या वर्कफ्रंडबाबत बोलायचं झाल्यास, श्वेता तिवारीने केवळ मालिकेत नाही तर, सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
