Tejaswini Pandit on Raj Thackeray : राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Elections Result 2024) रणधुमाळी आता संपली असून निकालचे कौल समोर आले. 288 पैकी 236 जागा जिंकत महायुतीने (Mahayuti) मोठा विजय विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवला आहे. यामध्ये 137 जागा मिळवत भाजप (BJP) हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पण या सगळ्यात चर्चेत राहिलेल्या मनसे पक्षाला यंदाच्या निवडणुकीत खातचं उघडता आलं नाही. इतकच नव्हे तर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना देखील या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. 


राज ठाकरेंचा एकही उमेदवार यंदाच्या निवडणुकीत निवडून आला नाही. त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील यंदाच्या निवडणुकीत रिंगणात होते. पण माहिम मतदारसंघातून त्यांना देखील पराभव स्वीकारावा लागला आहे. असं असलं अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरेंना पाठिंबा देणारी पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे. राज ठाकरेंना पाठिंबा देणारी पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आलीये. 


तेजस्विनी पंडितची पोस्ट नेमकी काय?


तेजस्विनी पंडितने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, विजयी उमेदवारांचं अभिनंदन! कोण? कसं? आणि काहीज का नाही हे अनुत्तरीत राहिल.. त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटला 100 पैकी 100...पण तरीही राजसाहेब ठाकरे एकनिष्ठ सदैवसोबत...आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू!




विधानसभा निकालावर राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया 


राज्यातील निकालावर अनेक नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आलेल्या आहेत. त्यातच राज ठाकरे यांनीही या निकालावर प्रतिक्रिया देताना एकदी एकाच वाक्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, अविश्वसनीय! तुर्तास इतकच... राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया देखील बरीच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं.                                                                     


महाराष्ट्र विधानसभा निकालांचे कौल


महाराष्ट्र विधानसभा निकालांमध्ये भाजपला 137, शिंदे गटाला 58, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. महायुतीने एकूण 236 जागांवर विजय संपादित केला आहे. तसेच महाविकास आघाडीला एकूण 49 जागांवरच विजय मिळाला आहे. यामध्ये काँग्रेसला 16, ठाकरे गटाला 20 आणि शरद पवार गटाला 10 जागाला मिळाल्या आहेत. 


ही बातमी वाचा : 


Vandre East Vidhan Sabha Election Result 2024: मातोश्रीचं मैदान ठाकरेंनी मारलं; वरुण सरदेसाईंचा मोठा विजय, झिशान सिद्दीकींचा 11 हजार मतांनी पराभव