Tejaswini Pandit on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (दि. 14) 57 वा वाढदिवस आहे. या वाढदिनी त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे नेते आणि सर्व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दुसरीकडे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्याची संधी सोडलेली नाही. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरेंसोबतचा खास फोटो शेअर करत हटके कॅप्शन लिहिलंय.
तेजस्विनी पंडितने लिहिलं की, मराठी अस्मितेच्या पाठीराख्याला, मराठी भाषेच्या पोषिंद्याला, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राला आणि ह्या सगळ्या पलीकडे एका मनस्वी ,सच्च्या, अनोख्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा ! राजसाहेब खरंच, तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केंव्हाच सोडून दिलं !देव तुम्हाला दीर्घायु देवो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ! हसत रहा 💖
देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देताना म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
इतर महत्त्वाच्या बातम्या
करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती होता अमेरिकन? कागदपत्रांमुळे पार्थिव भारतात आणण्यास होणार उशीर?