Tejaswini Lonari Visit Yeolas Kotamgaon Jagdamba Mata Temple: अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Actress Tejaswini Lonari) सध्या चर्चेत आहे, ती तिच्या यूट्यूब चॅनलमुळे. अभिनयाचा सोबतीला स्वतःची निर्मिती असलेल्या यूट्यूब चॅनलमधून सध्या तिनं महाराष्ट्रामधल्या मंदिरांचा प्रवास सुरू केला आहे आणि नवरात्री निमित्तानं तिनं येवला मधल्या एका खास मंदिराला भेट दिली. 

Continues below advertisement

येवल्यातल्या जागृत देवस्थानाबद्दल बोलताना मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी म्हणाली की, "टेम्पल ट्रेल्स मधला हा मंदिरांचा प्रवास नवरात्रीच्या उत्सवात महाराष्ट्रा मधल्या अशा एका मंदिरात जाऊन पोहचला, जे माझ्या खूप जवळचं आहे, मी मुळात येवल्याची असल्यानं प्रत्येक नवरात्रोत्सवात माझं मूळ असलेल्या येवल्याच्या जगदंबा माता मंदिर, कोट्टमगा इथे नक्की जाते, आमच्यासाठी हे श्रद्धास्थान आहे... असं म्हणतात की, इथे मागितलेली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होते. नवसाची देवी असलेली ही माता जगदंबा कायम सगळ्यांचं रक्षण करते आणि माझ्या मंदिरांच्या प्रवासात हे मंदिर प्रेक्षकांना दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. दरवर्षी नवरात्रीचे उपवास करत असताना नऊ दिवसाचं खास फोटो शूट करणं ही खूप खास गोष्ट आहे, नवरात्रीत शूट करत असताना या नऊ दिवसांची गंमत यातून अनुभवता येते..." 

नऊ दिवसाची अनोखी ऊर्जा दाखवत तेजस्विनीने नवरात्रोत्सवात नऊ रंगाच्या साडीत छान फोटोशूट देखील केलं आहे. फॅशन लाईफ स्टाईल यांना एक सणाचा मॉर्डन टच देऊन तिनं हे सुंदर फोटो शूट केलं आहे.                

अभिनेत्री असलेल्या तेजस्विनीनं स्वतःचा हा निर्मिती विश्वातला प्रवास देखील सुरू केला आहे, येणाऱ्या काळात ती कोणत्या नव्या भूमिकांमध्ये दिसणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.         

तेजस्विनीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, बिग बॉस मराठीमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सध्या तिचं युट्यूब चॅनलवर झळकतेय. याशिवाय तिनं मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर 'तुझेच मी गीत गात आहे', या मालिकेत प्रियाला रिप्लेस केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Tejaswini Lonari On Priya Marathe: 'प्रिया मराठेला रिप्लेस करताना दडपण आलेलं...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा