Tom Cruise-Ana de Armas Wedding: जगप्रसिद्ध सुपरस्टार चौथ्यांदा लग्न करणार आहे. पुन्हा एकदा त्यानं त्याची आयुष्यभराची जोडीदार म्हणून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची निवड केली आहे. त्यांच्या डेटिंगच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून पसरत होत्या. अशातच आता 63 वर्षांच्या सुपरस्टारनं त्याच्याहून 26 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीची निवड केली आहे. अभिनेता ज्या अभिनेत्रीसोबत आपली लग्नगाठ बांधणार आहे, त्या अभिनेत्याचं नाव आहे, हॉलिवूड सुपरस्टार 'टॉम क्रूझ' (Tom Cruise). 

रडार ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, टॉम क्रूझ लवकरच हॉलिवूड अभिनेत्री अना डी आर्मास (Tom Cruise-Ana de Armas Wedding) सोबत लग्न करू शकतो. दरम्यान, जोडप्याकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

 63 व्या वर्षी अंतराळात लग्न...

रडार ऑनलाईनच्या वृत्तानुसार, टॉम क्रूझ आणि अना डी आर्मास (Ana de Armas) लग्न करत आहेत आणि हे लग्न टॉम क्रूझ चित्रपटाइतकंच अॅडव्हेंचरस असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "टॉम क्रूझ आणि अना डी आर्मास या दोघांनाही अॅडव्हेंचर्स आवडतात आणि हेच त्यांना एकत्र आणतं. म्हणूनच, त्यांना त्यांच्या या छंदांचं प्रतिबिंब असणारा शाही, पण हटके अंतराळ सोहळ्यात लग्नगाठ बांधायची आहे." 

टॉम क्रूझला अनेक अॅडव्हेंचर्स करायला आवडतात. तसेच तो अंतराळ प्रवासाबद्दल उत्साही आहे, त्यामुळे तो अंतराळात लग्न करण्याचा विचार नक्कीच करू शकतो. स्कायडायव्हिंग करताना हवेत शपथा घेण्याचीही चर्चा आहे. सूत्रानं सांगितलं की, "ते जे काही करतील ते नेहमीपेक्षा खूप वेगळं असेल." जुलैमध्ये जेव्हा ते एकत्र फिरताना दिसले, तेव्हा दोघे डेटिंग करत असल्याच्या सुरू झाल्या. 

टॉम क्रूझनं यापूर्वी केलीत तीन लग्न 

63 वर्षीय टॉम क्रूझनं यापूर्वी तीन लग्न केलीत. त्यानं मिमी रॉजर्स, निकोल किडमन आणि केटी होम्सशी लग्न केलेलं. दरम्यान, काही काळानं त्यानं तिघांनाही घटस्फोट दिला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "टॉम क्रूझ जेव्हा पहिल्यांदा केटीच्या प्रेमात पडला, तेव्हा तो जितका उत्साही होता, तितकाच उत्साही आहे, कदाचित त्याहूनही अधिक. पण तो ते लपवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून लोक त्याच्यावर टीका करू नयेत."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

सोनम कपूरकडे पुन्हा गूड न्यूज? चाळीशीला टेकलेली अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार