Tanushree Dutta Crying Video: बॉलिवूडचं (Bollywood) काळं सत्य आजवर अनेक अभिनेत्रींनी सर्वांसमोर आणलं आहे. अशी एक अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta), जिनं काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत बॉलिवूडमध्ये (Bollywood News) गैरवर्तन झाल्याचा दावा केलेला. Me Too वर व्यक्त होत, तिनं दिग्गज अभिनेत्याचं नाव घेऊन खळबळजनक आरोप केले होते. पण, सध्या हिच तनुश्री दत्ता फार कठीण काळातून जात आहे. तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 2018 च्या Me Too चळवळीदरम्यान आवाज उठवल्यापासून तिला खूप त्रास दिला जात असल्याचं तनुश्रीनं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. कंटाळून तिनं पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याबाबत सांगितलं आणि मदतीची मागणी केली.
तनुश्री दत्तानं तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री ढसाढसा रडताना दिसतेय. व्हिडीओमध्ये ती म्हणते की, "मित्रांनो, माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय. मी नुकताच पोलिसांना फोन केलाय, मी निराशेतून पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले. त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलंय, जेणेकरून मी योग्यरित्या तक्रार दाखल करू शकेन. कदाचित मी उद्या तिथे जाईन कारण माझी तब्येत ठीक नाही."
"स्वतःच्याच घरात, अडचणीत सापडलेय..."
तनुश्री दत्तानं व्हिडीओमध्ये पुढे म्हटलंय की, "मला एवढा त्रास देण्यात आलाय, गेल्या 4-5 वर्षांत की, माझी तब्येत बिघडली आहे. मी काहीच काम करू शकत नाहीये, माझं संपूर्ण कुटुंब बरबाद झालंय, मी हाऊस हेल्परही ठेवू शकत नाही... त्या लोकांनी माझ्या घरात एक हाऊस हेल्पर ठेवलेली, तिच्यामुळे मला अत्यंत वाईट अनुभव आलाय. यायचं आणि चोरी करुन निघून जायचं... मला सर्व कामं स्वतःच करावी लागतायत... मी माझ्याच घरात खूपच अडचणींमध्ये सापडली आहे... प्लीज कुणीतरी माझी मदत करा..."
"कुणीतरी माझी मदत करा, नाहीतर खूपच उशीर होईल..."
अभिनेत्रीनं व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "मी या छळाला कंटाळलेय. 2018 च्या 'Me Too' पासून हे सुरू आहे. आज, कंटाळून मी पोलिसांना फोन केला. कृपया कोणीतरी मला मदत करा. खूप उशीर होण्यापूर्वी काहीतरी करा."
नेमकं प्रकरण काय?
2018 मध्ये Me Tooo चळवळीदरम्यान तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 2008 मध्ये आलेल्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांचा शारीरिक छळ केल्याचा आरोप अभिनेत्रीनं केला होता. दरम्यान, पोलिसांना अभिनेत्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :