Pragabha Kolekar Reveals Bad Experiences About Industry: बॉलिवूडच्या (Bollywood News) झगमगत्या जगातले धक्कादायक किस्से आतापर्यंत आपण अनेक अभिनेत्रींच्या तोंडून ऐकले आहेत. पण, याबाबतीत मराठी इंडस्ट्रीही (Marathi Industry) काही मागे नाही. मराठी इंडस्ट्रीच्या झगमगत्या जगामागेही काळाकुट्ट अंधार दडला आहे, काही अभिनेत्रींनी सांगितलेल्या धक्कादायक अनुभवांवरुन हे बऱ्याचदा सिद्ध झालं आहे. सेलिब्रिटी म्हटलं की, नेत्यांचे कार्यक्रम, उद्घाटन समारंभ, वाढदिवस अशा अनेक कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावण्यासाठी आमंत्रणं, निमंत्रणं येतात. मात्र, एका मराठी अभिनेत्रीसोबत या प्रसंगी अत्यंत किळसवाणा आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडला.अशाच एका अभिनेत्रीनं धाडस करुन तिला आलेल्या काही धक्कादायक अनुभवांचा खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेत्रीनं यासंदर्भात माहिती दिली.
मराठी मालिका (Marathi Serial) 'अंतरपाट'मध्ये संध्या हे पात्र साकारलेली मराठमोळी अभिनेत्री प्रगल्भा कोळेकरनं (Marathi Actress Pragabha Kolekar) आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ती 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतही महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेली. प्रगल्भा कोळेकरनं तिला आलेल्या धक्कादायक अनुभवांचा खुलासा केला आहे. फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर मराठी इंडस्ट्रीमध्येही हे प्रकार सर्रास घडतात.
प्रगल्भा कोळेकरनं काय सांगितलं?
प्रगल्भा कोळेकर एका सोनाराच्या दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेली होती. प्रगल्भानं सांगितलं की, "कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडला. दुकानाची आरती करायची होती, तेव्हा दुकानाच्या मालकानं मला विचारलं की तुमचा प्लॅन काय आहे? मी त्यांना म्हटलं काही नाही. इतक्या दूर आले आहे, तर आता घरीच जाईन. त्यावर ते मला म्हणाले, आपण प्लॅन करायचा का?"
"त्याला प्रश्न मला कळाला नाही, मी त्यांना विचारलं कसला प्लॅन? तर ते म्हणाले की, आपण कुठेतरी जायचं का? त्यांच्याकडून पुन्हा असा प्रश्न येताच प्रगल्भाला फारच विचित्र वाटलं आणि त्यानंतर तिनं तात्काळ त्यांना विचारलं की, तुम्ही मला असं का विचारताय? त्यावर त्यांचं उत्तर होतं की, आम्ही याआधी ज्या अभिनेत्रीला बोलावलेलं, त्या सगळ्या ओके म्हणालेल्या... तुम्हाला जे करायचं ते करा, पण त्यावरून आम्हाला जज करू नका.", असं प्रगल्भानं त्यांना ठणकावून सांगितलं.
पुढे बोलताना प्रगल्भानं इंडस्ट्रीतल्या अनुभवांबाबत आणखी काही उदाहरणं दिली. ती म्हणाली की, "काही जण, 'तू मुझे मिल... मैं तुझे स्टार बनाता हूं...' या झोनमध्ये असतात. भेटल्यानंतर तुला काय आवडतं? कुठे फिरायला आवडतं? चल बसूया का? असं डायरेक्ट विचारतात. आपण आता भेटलो ना? आपली पहिली भेट आहे, मग हे प्रश्न का विचारायचेत? कधी कधी ऑडिशनही होत नाही. नुसत्याच मिटिंग होतात. काही जण सिरियलचे दिवस कमी करू असं म्हणतात. माझं काम माझ्या जोरावर मी मिळवलंय. तू तुझं काम कर... मी घाबरत नाही..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :