Tabu Love Story : बॉलिवूडची टॅलेंटेड अभिनेत्री तब्बूने 90 च्या दशकातील सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलंय. मात्र, तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमी चर्चेचा विषय असतं. 53 वर्षीय तब्बू आजही देखील अविवाहित आहे, तिनं लग्न केलेलं नाही. मात्र, अविवाहित राहण्यामागे काय कारण आहे? तर तब्बू एका सुपरस्टारच्या प्रेमात पडली होती. त्याच्यासाठी तब्बल 10 वर्षे तिने वाट पाहिली. मात्र, 10 वर्षे वाट पाहून देखील तिचं प्रेम तिला भेटलंच नाही आणि ती अजूनही अविवाहित राहिली आहे. कोणता अभिनेता आहे? ज्याच्यासाठी तब्बूने आयुष्यातील महत्त्वाची 10 वर्षे घालवली...जाणून घेऊयात... 


तब्बूचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांशी जोडलं जातं. मात्र तिने कधीही उघडपणाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं नाही. मीडियी रिपोर्ट्नुसार, तिचं पहिलं अफेअर संजय कपूर बरोबर असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर निर्माते साजिद नाडियाडवालासोबत देखील तिची जवळीक वाढल्याची चर्चा होती. त्याशिवाय अभिनेता अजय देवगण याच्याशी देखील तिची खास मैत्री होती. त्यामुळे तब्बूच्या आयुष्याबाबत अनेक अफवा पसरलेल्या पाहायला मिळाल्या. 


तब्बूने 10 वर्षे पाहिली होती प्रेमाची वाट 


तब्बूच्या आयुष्यात असाही व्यक्ती होता, ज्याच्यासाठी तिने 10 वर्षे वाट पाहिली होती. मात्र, तरिदेखील त्यांचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून साऊथचा सुपरस्टार नागार्जुन आहे. नागार्जुन आणि तब्बूने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. सिनेमात काम करत असताना दोघांमध्ये जवळीक देखील वाढली होती. त्यांचं प्रेमसंबंध जवळपास 10 वर्षे सुरुच होते. मात्र, त्यांच्या प्रेमात सर्वात मोठं संकट होतं. कारण नागार्जुनचं त्यापूर्वीच लग्न झालं होतं. 


जेव्हा तब्बू आणि नागार्जुनच्या नात्याच्या बातम्या होऊ लागल्या, त्याच्या अगोदरच नागार्जुनचं लग्न झालं होतं. नागार्जुनचा पत्नी आमला हिच्या विवाह झाला होता. नागार्जुन तब्बूशी कधीही खोटं बोलला नाही. पत्नीशी घटस्फोट घेणार नसल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितलं. तब्बूने मोठा कालावधी उलटून देखील हे नात निभावलं होतं. मात्र, शेवटी तिच्या लक्षात आलं की, या प्रेमाला कोणतंही भविष्य नाही. 


तब्बूने प्रेमापासून दुरावा घेतला 


दरम्यान, नागार्जुनपासून वेगळं झाल्यानंतर तब्बूने कधीही वैयक्तिक आयुष्याबाबत उघडपणाने भाष्य केलं नाही. शिवाय त्यानंतर तिने कधीही रिलेशनशिपमध्ये जाण्याचा निर्णय देखील घेतला नाही, संपूर्ण आयुष्य सध्या ती एकटेपणात घालवत असल्याचं चित्र आहे. वयाच्या 53 वर्ष उलटले असतानाही तब्बूने विवाह केलेला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


सहज ऑडिशन द्यायला गेली अन् आयपीएलची सर्वात सुंदर अँकर बनली, पुढे घटस्फोटीत अभिनेत्याशी लग्नही उरकलं