मुंबई : सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) ही अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. यातील एक एक पात्रं चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. यातील मुख्य पात्र म्हणजे जेठालाल. जेठालालचं बबितावरचं प्रेम झाकून राहिलेलं नाही. जेठालालची क्रश असलेली बबिता ही खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र टप्पूसोबत असल्याची चर्चा आहे. 


बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत (Raj Anadkat) रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. ई-टाइम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे. या रिपोर्टनुसार मुनमुन आणि राज दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. मुनमुन सोशल मिडीयावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे अनेक फोटे शेअर करत असते. राज तिच्या फोटोंवर करत असलेल्या कमेंट्ंसमुळे त्यांच्या अफेरअरची चर्चा रंगली आहे.


'तारक मेहता...' फेम मुनमुन दत्ताच्या अडचणीत वाढ, इंदोरमध्ये गुन्हा दाखल


तिच्या फोटोंवर राजच्या कमेंट्स पाहून दोघांचे संबंध मैत्रीपेक्षा पुढे गेल्याचं कळतं. विशेष म्हणजे मुनमुन दत्ता ही राज पेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. अर्थात त्यांच्या नात्याबाबत दोघांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. 


मुनमुन बराच काळ शोमधून गायब होती, पण काही दिवसांपूर्वीच ती शोमध्ये परतली. वास्तविक, मुनमुन तिच्या एका व्हिडीओवरून वादात अडकली होती, त्यानंतर तिने सोशल मीडियावर माफीही मागितली होती. या वादानंतर, मुनमुन शोमध्ये दिसली नाही, त्यानंतर प्रेक्षकांना वाटले की तिने शो सोडला आहे. परंतु, अलीकडे प्रत्येकजण अभिनेत्री परतल्याने खूप आनंदी आहे.



13 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शोमध्ये मुनमुन दत्ता सुरुवातीपासूनच मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी ‘टप्पू’चे पात्र अभिनेता भव्य गांधी यांनी साकारले होते. मात्र, 2017 मध्ये भव्यने हा शो सोडल्यानंतर राजने टप्पूची भूमिका साकारण्यास सुरुवात केली.


मुनमुन दत्ताचं वादग्रस्त वक्तव्य आणि माफिनामा
मुनमुन दत्ता ऊर्फ बबितानं काही दिवसांपूर्वी अनुसुचित जातींबाबत केलेल्या एका टिप्पणी केली होती.  तिच्याविरूद्ध अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते.  तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात तिने एका विशिष्ट जातीबद्दल आपत्तीजनक टिप्पणी केली होती. त्यावरुन तिच्यावर टीकेच झोड उठली होती.  या प्रकरणी गुन्हा नोंद होण्यापूर्वीच अभिनेत्री मुनमुन दत्ताने माफी मागितली होती.