Taarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Dilip Joshi: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) प्रेक्षकांना भरभरुन हसवत आहे.  या मालिकेला (Entertainement) मनोरंजनाची मेजवानी म्हणायला हरकत नाही.  या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. मुख्य म्हणजे जेठालालची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेले दिलीप जोशी यांना आज कोणत्याही विशेष परिचयाची गरज नाही.  जेठालालची भूमिका साकारुन दिलीप जोशींनी (Dilip Joshi) प्रेक्षकवर्गाचं भरभरुन मनोरंजन केलं. या मालिकेतील सर्व पात्रांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  दरम्यान, जेठालाल ही व्यक्तीरेखा लक्षात राहण्यासारखी आहे.  'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत त्यांना दहावी नापास दाखवण्यात आलं आहे.  इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय चालवणारे जेठालाल यांना इंग्रजी बोलताना अडचणी येतात. परंतु, खऱ्या आयुष्यात  जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी हे सुशिक्षित आहेत.  आज दिलीप जोशी यांचा वाढदिवस. नेमकं किती शिकले दिलीप जोशी?  पाहूयात.

Continues below advertisement

जेठालाल म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिलीप जोशी  हे 26 मे रोजी आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 1968 साली गुजरातच्या पोरबंदरमधील गोसा या गावात झाला.  दिलीप जोशींनी आपल्या कारकि‍र्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  कधी बॉलिवूडमध्ये नोकराची भूमिका तर, कधी अभिनेता सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली.  मात्र, दिलीप जोशींना खरी ओळख 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या धमाकेदार कॉमेडी मालिकेतून मिळाली. 

जेठालाल अर्थात दिलीप जोशी किती शिकलेत? (Dilip Joshi education qualification)

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील जेठालाल आपल्या विनोदी टायमिंगसाठी ओळखले जातात. या मालिकेत ते अनेकदा बबिताजी म्हणजेच  मुनमुन दत्तासोबत फ्लर्ट करताना दिसतात.  जेठालाल चंपकलाल गडा ही भूमिका साकारुन  लोकप्रियता मिळवलेल्या  दिलीप जोशी यांना मालिकेत दहावी नापास दाखवण्यात आले आहे.  परंतु, खऱ्या आयुष्यात दिलीप जोशी हे पदवीधर आहेत. त्यांनी मुंबईतील नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्समधून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स ही पदवी मिळवली आहे.  त्यांनी थिएटरचाही अभ्यास केला आहे.

Continues below advertisement

बॉलिवूडच्या बड्या सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Dilip Joshi career)

दिलीप जोशींनी  आपल्या करिअरची सुरुवात  'मैने प्यार किया' या सिनेमातून केली.   या सिनेमात त्यांनी सलमान खान यांच्या घरातील नोकर रामूची भूमिका साकारली आहे.   यानंतर दिलीप जोशींनी आपल्या कारकि‍र्दीत 'हम आपके है कौन', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'खिलाडी 420' आणि 'हमराझ', यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. यानंतर 2008 साली त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत धमाकेदार एन्ट्री केली.  18  वर्ष त्यांनी जेठालाल म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सस्पेन्स अन् थिलरनं चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं; 'दृश्यम 3' नं 5 दिवसांत सिनेप्रेमींची मनं जिंकली, किती कोटींचा गल्ला जमावला?