Drishyam 3 Box Office Collection: मोहनलाल अभिनीत (Mohanlal) आणि जीतू जोसेफ दिग्दर्शित मल्याळम क्राइम थ्रिलर 'दृश्यम 3' (Drishyam 3) बॉक्स ऑफिसवर (Box Officce) धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाची प्रचंड चर्चा होती. 'दृश्यम 3' या बहुचर्चित सिनेमात (Entertainment) नेमकं कोणतं गुढ उलगडणार याची चर्चा प्रेक्षकवर्गामध्ये होती. दरम्यान, ही प्रतिक्षा 21 मे रोजी संपली. बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' सिनेमागृहात रिलीज झाला असून, या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासून उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळत आहे. दमदार सुरुवातीनंतर या सिनेमाने विकेंडमध्येही धुमाकूळ घातला. दरम्यान, पाचव्या दिवशी, म्हणजेच पहिल्या सोमवारी या दमदार सिनेमाने किती कोटींची कमाई केली? जाणून घेऊयात.
'दृश्यम 3'ने पाचव्या दिवशी किती रुपयांची कमाई केली? (Drishyam 5th Day box office collection)
मोहनलालच्या 'दृश्यम' फ्रँचायझीमधील दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते. सस्पेन्स थ्रिलर सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार? याकडे प्रेक्षकवर्गाचं लक्ष होतं. प्रेक्षकवर्गाला तिसऱ्या भागाकडूनही खूप अपेक्षा होत्या. दरम्यान, 'दृश्यम 3' 21 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला असून, प्रेक्षकांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाने पहिल्या दिवसापासून दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली. परंतु, पहिल्या सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
'दृश्यम 3' वर्ल्डवाइड किती कोटींचा गल्ला जमावला? (Mohanlal Drishyam 3 first Monday earnings)
'दृश्यम 3' या सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.85 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 11.05 कोटींचा गल्ला जमावला. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 13.70 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 13.85 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'दृश्यम 3'ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी 7.35 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिस कमाई केली. यामुळे 'दृश्यम 3' या सिनेमाची 5 दिवसांतील एकूण कमाई आता 61.80 कोटी रुपये झाली आहे.
'दृश्यम 3' या सिनेमाने भारतात 50 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. वर्ल्डवाइड या सिनेमाची उत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे. वर्ल्डवाइड या सिनेमाने पाचव्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे. वर्ल्डवाइड या सिनेमाने 156.14 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
