Rupali Ganguly Slams Dhruv Rathee: टीव्हीवरील 'अनुपमा' (Television Serial Anupama), म्हणजेच रूपाली गांगुली (Rupali Ganguly ), हिनं युट्यूबर ध्रुव राठी (YouTuber Dhruv Rathee) याच्यावर जोरदार टीका केली आहे. 49 वर्षांचा रूपालीचा हा संताप ध्रुव राठीच्या (Dhruv Rathee) अशा एका ट्वीटमुळे उफाळून आला, ज्यावर अलीकडेच अभिनेत्री गुल पनागनंही टीका केली होती. 19 मे रोजी ट्विटरवर पोस्ट करताना ध्रुव राठीनं लिहिलं होतं की, "मोदी जिथे कुठे जातील, तिथे सर्वत्र त्यांचा अपमानच झाला पाहिजे." यूट्यूबरची ही पोस्ट समोर आल्यापासूनच त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 

Continues below advertisement

नॉर्वेजियन पत्रकार हेले गॅनेस्टॅड यांच्याशी संबंधित एका घटनेनंतर ध्रुव राठीनं ही पोस्ट केली होती. आता, अभिनेत्री रूपाली गांगुलीनं या प्रकरणावर एक सविस्तर पोस्ट लिहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. अत्यंत स्पष्ट आणि कठोर शब्दांत रुपाली गांगुलीनं म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात आदरणीय आणि प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक आहेत. पुढे अभिनेत्रीनं असंही लिहिलंय की, परदेशात बसून राहणाऱ्या आणि भारतातील जमिनी वास्तवाशी ज्याचा काहीही संबंध नाही, तरीही जो स्वतःला आपला प्रवक्ता असल्याचं भासवतो, अशा कोणत्याही युट्यूबरची या देशाला काहीही गरज नाही. मात्र, अनेक युजर्सनी रूपाली गांगुलीवरच टीका केली आहे.

ध्रुव राठीनं मोदींवर काय टीका केलेली? (Dhruv Rathee Post On PM Modi)

Continues below advertisement

प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यानं त्याच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केलेलं. त्यानं ट्विटरवर लिहिलेलं की, "मोदी जिथं जातील तिथं त्यांचा अपमान झाला पाहिजे. पंतप्रधान झाल्यापासून गेल्या 12 वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. एक नेता म्हणून पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. मी इतर युरोपीय देशांतील परदेशी पत्रकारांना प्रोत्साहन देऊ इच्छितो की, मोदी जिथं दिसतील तिथं त्यांना प्रश्न विचारावेत, जेणेकरून ते लोकांसमोर उत्तर देण्यास भाग पडतील..."

रुपाली गांगुलीनं ध्रुव राठीला फटकारलं (Rupali Ganguly Slams Dhruv Rathee)

युट्यूबर ध्रुव राठी याचं ट्वीट पाहून अभिनेत्री रुपाली गांगुली प्रचंड संतापली. तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ध्रुव राठीच्या पोस्टला कोट करत तिनं लिहिलंय की, "आमच्या पंतप्रधानांसाठी 'अपमान' हा शब्द ऐकणं अत्यंत विचित्र आहे. अशा नेत्यासाठी हा शब्द वापरला जातोय, ज्यांना जगभरातील देश आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करत आहेत. माझे पंतप्रधान आज जगातील सर्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित आणि प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक आहेत. ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे लोकशाही मार्गानं निवडून आलेले पंतप्रधान आहेत..."

रूपाली गांगुली हिनं पुढे लिहिलंय की, "भारताच्या प्रगतीची काळजी आम्हा भारतीयांवर सोडा. आपल्या देशासाठी काय चांगलं आहे, हे ठरवायला 140 कोटींहून अधिक भारतीय सक्षम आहेत. परदेशात बसून, भारताच्या वास्तवापासून पूर्णपणे तुटलेल्या आणि भारताचा द्वेष करून स्वतःची ऑनलाईन कारकीर्द बनवणाऱ्या कोणत्याही युट्यूबरची आम्हाला प्रवक्ता म्हणून गरज नाही..."

रुपाली गांगुली जोरदार ट्रोल (Rupali Ganguly Trolled)

ध्रुव राठीला रुपाली गांगुलीनं दिलेल्या उत्तरावरुन तिचं अनेकांनी कौतुक केलं. पण, काहींनी तिला जोरदार ट्रोलही केलंय. एका युजरनं लिहिलंय की, "मॅडम, कृपया आम्हाला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, गेल्या 12 वर्षांत आपल्या पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद का घेतली नाही? आणि जगातील कोणत्याही ठिकाणी पत्रकारांच्या कठीण प्रश्नांना सामोरं जाण्यास ते असमर्थ का ठरत आहेत?"

आणखी एका युजरनं लिहिलंय की, "मला असं वाटतं की, सामान्य नागरिकांना ज्या वास्तवाचा सामना करावा लागतो, त्याबद्दल रूपाली पूर्णपणे अनभिज्ञ आहे, कारण तिच्याकडे अमाप संपत्ती असल्यानं, ती आपली बिलं सहज भरू शकते. तेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किमती तिला सहज परवडतात. इतकंच नव्हे, तर तिच्या घरी एलपीजी (LPG) सुद्धा आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, निवडणुका खरोखरंच लोकशाही मार्गानं जिंकल्या गेल्या होत्या, याचा कोणताही पुरावा तुम्ही लोक देऊ शकता का?" 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ranveer Singh Responds After FWICE Ban: रणवीर सिंहला 'डॉन 3' सोडणं महागात; फिल्म वर्कर्सच्या सर्वात मोठ्या संस्थेनं इंडस्ट्रीत घातलीय बंदी, आता म्हणतोय...

ABP माझाच्या बातम्या LIVE...