Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंहनं (Ranveer Singh) केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काही लोक रणवीरला सोशल मीडियावर ट्रोल देखील करत आहेत. तर काही लोक त्याचं समर्थन करत आहेत. रणवीरनं केलेल्या या फोटोशूटवर अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया दिली आहे. आता अभिनेत्री  स्वरा भास्करनं (Swara Bhasker) रणवीरच्या या फोटोशूटवर आणि त्यावर सुरु असलेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. 


स्वराचं ट्वीट
एक व्यक्तीनं रणवीरवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत ट्वीट शेअर केले  होते. या ट्वीटला रीट्वीट करुन स्वरानं एक ट्वीट शेअर केलं. त्यामध्ये तिनं लिहिलं, 'अविश्वसनीय... आपल्या देशात मूर्खपणा आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.' 






पुढे स्वरानं आणखी एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, 'अनेक गंभीर मुद्दे आहेत. हे गंभीर सर्वसामान्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना ते दिसू नयेत, त्यामुळे रणवीर सिंहचा मुद्दा समोर आणला जात आहे. प्रसारमाध्यमांसाठीही ते फायद्याचे आहे.'






रणवीरवर अश्‍लीलता पसरवण्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदिका चौबे म्हणाल्या, "मी आणि माझे पती अभिषेक चौबे यांच्या एनजीओने या प्रकरणी सोमवारी चेंबूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याची दखल घेत एनजीओच्या याचिकेवर एफआयआर नोंदवला आहे." रणवीरच्या फोटोशूटमळे महिलांच्या भावना दुखावल्या जात आहेत, असा ही आरोप रणवीरवर केला जात आहे.


रणवीर सिंह विरोधात न्यूड फोटोशूटप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यूड फोटोसेशन करणारा अभिनेता रणवीर सिंह विरोधात मुंबईतल्या चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 292, 293, 509 आणि इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याच्या कलम 67 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


रणवीरने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केले. रणवीरचे हे न्यूड फोटो सोशल मीडियावर मे किंवा जूनमध्ये रिलीज करण्यात येणार होते. पण रणवीरचा चित्रपट तेव्हा रिलीज करण्यात येणार होता. त्यामुळे फोटोशूटचे फोटो उशीरा रिलीज करण्यात आले. रणवीरच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. मिलिंद सोमण, मधु सप्रे, आमिर खान, शर्लिन चोप्रा, पूजा बेदी,सपना भवनानी या सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केले होते. 


हेही वाचा: