Swara Bhasker and Avika Gor: बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वरा भास्कर ची अचानक तब्येत खालवली असून तिला डेंग्यूमुळे (Dengue) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वरा भास्करने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे. ही माहिती तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना कळताच अभिनेत्रीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी स्वराची प्रकृती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान, टीव्ही अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) हिला देखील डेंग्यूची लागण झाली आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करला डेंग्यूची लागण, पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Swara Bhasker Diagnosed With Dengue)
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन देखील दिलं आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटलं की, ' सगळं किती लवकर झालं आहे. डेंग्यू झाला, आणि हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं'. स्वराच्या या पोस्टमुळे चहा ते चिंतेत पडले आहे. दरम्यान, डेंग्यूमुळे स्वराला किती दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
बालिका वधू फेम अविका गौर हिला देखील डेंग्यूची लागण झाली आहे (Swara Bhasker and Avika Gor Suffers From Dengue)
स्वरा भास्करआधी 'बालिका वधू' फेम टीव्ही ॲक्ट्रेस अविका गौर हिला देखील डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू कारणामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. अविकाचे पती मिलिंद चांदवानी यांनी अलीकडेच याची माहिती दिली. मिलिंद यांनी खुलासा केला की, अविकाला नेमकं काय झालं? याची माहिती समोर येणायापूर्वी, सलग पाच दिवस अविकाला ताप आला होता. चाचणी केल्यानंतर तिला डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली.
चाचण्यांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. नंतर अविकाला तातडीने रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. मिलिंद यांनी यावेळी हे देखील उघड केलं की, प्रकृती खालवलेली असूनही अविकाने आपले काम थांबवलेले नाही. ताप असूनही तिने शूटिंग पूर्ण केले. यानंतर अविकाने हॉस्पिटलमधून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून, नेटकरी तसेच तिच्या चाहत्यांनी तिच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे. तसेच अभिनेत्री लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
