Joru Ka Ghulam Director Shakeel Noorani: मनोरंजन सिनेसृष्टीतून (Entertainment) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'जोरू का गुलाम' (Joru Ka Gulam) या सिनेमाचे दिग्दर्शक (Film Director) शकील नुरानी (Shakeel Noorani) (वय वर्ष 73) यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या मालवणी पोलिसांनी (Mumbai Police) दिग्दर्शक शकील नूरानी यांना (Director) बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणात अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? अटके मागचं कारण काय? जाणून घेऊयात.
नेमकं प्रकरण काय? (Director Shakeel Noorani Arrested Over Harassment Allegations)
मिळालेल्या माहितीनुसार एका 33 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. आगामी चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने शकील नुरानी यांनी अभिनेत्रीला घरी बोलावून घेतलं. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप अभिनेत्रीने तक्रारीत केला आहे. तिला कथितरित्या नशेचे पदार्थ देणे आणि व्हिडिओद्वारे धमकावल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
मिळालेला माहीतीनुसार शकील नुरानी यांनी 'बडे दिलवाला' (1999) आणि 'जोरू का गुलाम' (2000) यांसारख्या बिग बजेट सिनेमांचं लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालवणी पोलिसांनी BNS कलम 64(2) (M), 123, 351 (2) आणि 88 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, बोरिवली हॉलिडे कोर्टाने त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोण आहे शकील नूरानी? (Joru Ka Ghulam Director Shakeel Noorani Arrested)
शकील नूरानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 1990च्या दशकाच्या उत्तरार्धापासून बॉलिवूडमध्ये काम केले. शकील नूरानी यांच्या दिग्दर्शनातील प्रमुख चित्रपटांमध्ये ‘बडे दिलवाला’ (1999) आणि ‘जोरू का गुलाम’ (2000) यांचा समावेश होतो. ‘बडे दिलवाला’मध्ये सुनील शेट्टी, प्रिया गिल आणि परेश रावल यांच्या भूमिका होत्या, तर ‘जोरू का गुलाम’मध्ये गोविंदा, ट्विंकल खन्ना, कादर खान आणि जॉनी लिव्हर प्रमुख भूमिकेत होते. दरम्यान, या घटनेनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
