Ashleigh Gardner Controversy Cricket Australia : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार ॲशली गार्डनर (Ashleigh Gardner) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गार्डनरची पत्नी मोनिका राइट हिने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गंभीर आरोप होत असतानाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठोस भूमिका का घेतली नाही, असा सवाल राइटने केला असून गार्डनरला उपकर्णधारपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

Continues below advertisement

उपकर्णधारपदावरून हटवण्याची मागणी (Ashleigh Gardner cheating Controversy)

ॲशली गार्डनर आणि ऑस्ट्रेलियाचीच क्रिकेटपटू जॉर्जिया वॉल यांच्यात कथित संबंध असल्याचा दावा या वादाच्या केंद्रस्थानी आहे. मोनिका राइटच्या म्हणण्यानुसार, देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि युवा खेळाडूंसाठी रोल मॉडेल असलेल्या खेळाडूकडून उच्च नैतिक मानकांची अपेक्षा केली जाते. राइटने गार्डनरच्या नेतृत्वाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत म्हटले की, राष्ट्रीय संघात नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर खेळाडूंनी आपल्या वर्तनाचीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

Continues below advertisement

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया गप्प का?’ 

राइटने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मौनावरही नाराजी व्यक्त केली. तिच्या मते, जर एखाद्या वरिष्ठ खेळाडूचे संघातील कनिष्ठ सदस्यासोबत कथित संबंध असतील आणि त्यामध्ये सत्तेचा असमतोल असेल, तर बोर्डाने त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तिने सवाल केला की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणावर सार्वजनिकपणे काहीही का म्हटले नाही? बोर्डाची शांतता म्हणजे गार्डनर आणि जॉर्जिया वॉल यांच्या कथित वर्तनाला पाठिंबा आहे का, असा प्रश्नही तिने उपस्थित केला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भूमिका काय? (HOW DID CRICKET AUSTRALIA RESPOND?)

या आरोपांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मात्र हे प्रकरण वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंध कामाच्या ठिकाणी आदर धोरणाच्या चौकटीत असणे आवश्यक आहे. तसेच नेतृत्वाची जबाबदारी पार पाडताना संघाच्या प्रक्रियांच्या अखंडतेवर परिणाम होऊ नये आणि हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती व्यवस्था असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

एप्रिल 2025 मध्ये गार्डनर-राइटचे लग्न

गार्डनर आणि मोनिका राइट यांनी एप्रिल 2025 मध्ये लग्न केले होते. मात्र, 2025 महिला वनडे विश्वचषकाच्या काळात त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दोघेही वेगळे राहत आहेत. या वैयक्तिक वादामुळे गार्डनरच्या क्रिकेट कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेषतः त्या ऑस्ट्रेलियन संघाच्या उपकर्णधार असल्यामुळे या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे ही वाचा -

IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO