Swara Bhaskar On Weight Gain After Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आपल्या रोखठोक आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अलिकडेच स्वरा भास्करला तिच्या वाढलेल्या वजनावरुन ट्रोल (Trolled For Gaining Weight) करण्यात आलं. यावरही स्वरानं अगदी रोखठोकपणे आपलं वक्तव्य मांडलं आहे. आपल्या स्पष्टवक्त्या आणि प्रामाणिकपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करनं तिला ट्रोल करणाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे. स्वरा भास्करने नुकतीच तिच्या पतीसह 'फिल्मीग्यान'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या वक्तव्यांमुळेही अनेकदा ट्रोल केलं जातं, यावर तिनं तिचं मत मांडलं.
स्वरा भास्कर म्हणाली की, आता तिचं वय 35 पेक्षा जास्त झालं आहे आणि तिला एक मूल आहे, तिला 25 व्या वर्षी दिसायचं, तसं आता दिसण्याची गरज वाटत नाही. स्वरा म्हणाली की, ती तिच्या आयुष्यात स्वतःला आणि जीवनातील आनंदाला महत्त्व देतं, इतरांच्या मानसिकतेला आणि अपेक्षांना नाही..."
स्वरा भास्करनं 2023 मध्ये राजकीय नेते फहाद अहमदशी लग्न केलं आणि आता ती एका मुलीची आई आहे. तिची मुलगी राबियाच्या जन्मानंतर स्वराचं वजन वाढलं, यावरुनच सोशल मीडियावर तिच्यावर अनेकदा नकारात्मक टीका करण्यात आली.
ट्रोल करणाऱ्यांना स्वरा भास्करचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली की, "गरोदरपणानंतर वजन वाढले. त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केले गेले. आताही करतात. आता मला फरक पडत नाही." पुढे बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की, ""सुरुवातीला बाळाच्या जन्मानंतर तुम्ही खूप संवेदनशील असता. मानसिक स्थितीसुद्धा थोडी कमजोर असते. प्रत्येक गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होत असतो. त्यादरम्यानच्या काळात जे ट्रोलिंग केले जात होते. त्यावेळी मला वाईट वाटायचे. मला कळायचंच नाही की, लोक त्यावरुन का ट्रोल करत आहेत... कारण- गरोदरपणानंतर वजन वाढणे ही सामान्य गोष्ट आहे..."
स्वरा भास्कर पुढे बोलताना म्हणाली की, "आता मला समजले आहे की मूर्ख लोकांचे तुम्ही काहीही करू शकत नाही. ज्याच्या डोक्यात कचरा आहे, तो व्यक्ती सर्वांना कचराच दाखवणार आहे."
मुलाखतीत बोलताना स्वरा भास्करला विचारण्यात आलं की, अभिनेत्री किंवा सेलिब्रिटी म्हणून वजन कमी करण्यासाठी तुमच्यावर दबाव असतो का? यावर बोलताना स्वरा म्हणाली की, "तुम्ही जर अभिनेत्री असाल तर हा खूप दबाव असतो की तुम्ही आधी जसे दिसत होता, तसेच तुम्ही दिसायला हवे. मला वाटते की ज्या अभिनेत्री पुन्हा वजन कमी करु शकतात, बाळाच्या जन्माआधी त्या जशा दिसायच्या तशा दिसू शकतात. तर त्याला असे दाखवले जाते की खूप मोठे काहीतरी त्यांनी काम केले आहे. ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण, मला वाटते की प्रत्येकाच्या हा निवडीचा अधिकार आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :