Swapnil Joshi Wrote Special Post For Daughter: प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा सुपरहिरो असतो आणि त्या बाबासाठी आपली लेक ही सर्वस्व असते. अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीसोबत (Swapnil Joshi) असं काहीतरी घडलं की, त्यानं त्याच्या लेकीबद्दल खास पोस्ट लिहून तिचं तोंडभरून कौतुक केलं फक्त स्वप्नील नाही तर संपूर्ण इंडस्ट्रीनं स्वप्नीलची लेक मायराच कौतुक केलं आहे. या मागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर कळतंय की, स्वप्नील मागोमाग आता त्याची लेक मायरानं देखील कलाविश्वात पदार्पण केलं आहे.
अनेक कलाकार आणि त्यांची मुलं या इंडस्ट्रीचा भाग आहेत, अशातच स्वप्नील जोशीच्या चिमुकलीनं एका गोड गाण्यातून या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. अवधूत गुप्ते यानं स्वरबद्ध केलेल्या 'सांग आई' या गाण्यात मायरा जोशीनं अभिनय केला आहे. बाबाच्या पाऊलावर पाऊल ठेवत, लेक देखील या इंडस्ट्रीचा भाग झाली आहे, असं म्हणणं वावग ठरणार नाही.
स्वप्नीलसाठी हा फादर्स डे नक्कीच या गाण्यामुळे खास झाला आणि त्याला रिटर्न गिफ्ट देखील मिळालं आहे. स्वप्नीलनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहून त्याच्या लेकीचं कौतुक तर केलं आहे, सोबतीला स्वप्नील सांगतो की, "आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. मायराच्या आवडी पोटी तिनं केलेलं हे छोट काम आहे. हे तिचं सिने सृष्टीतील पदार्पण नाही, पण तुम्ही सगळ्यांनी तिला जे प्रेम दिलं त्या बद्दल सगळ्यांचे आभार. आमच्या सगळ्यासाठी हा तिचा क्षण खूप मौल्यवान आहे. तिनं तिच्या बाबाला दिलेलं हे खास गिफ्ट आहे."
दरम्यान, मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीनं बाल कलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर आता लेकीला या खास गाण्यातून बघताना त्याला खूप आनंद होतोय. येणाऱ्या काळात या बाप लेकीची जोडी ऑन स्क्रीन बघायला मिळणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :