Third Death Rishabh Shetty Kantara Chapter 1 Set: ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) यांच्या 'कांतारा: चॅप्टर 1' (Kantara Chapter 1 ) या चित्रपटाच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. अलिकडेच सेटवर झालेल्या एका अपघातानं टीम हादरली होती, त्या धक्क्यातून सावरत नाही, तोवर सेटवर आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन निजू यांचं निधन झालं आहे. ओमनोरमाच्या रिपोर्टनुसार, केरळमधील या अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. शुटिंग सुरू झाल्यापासून चित्रपटाच्या टीममध्ये हा तिसरा मृत्यू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निजू यांचं गुरुवारी रात्री 'कांतारा: चॅप्टर 1'च्या सेटवरच शुटिंग सुरू असतानाच बंगळुरूमध्ये निधन झालं.

सिनेमाचं शुटिंग सुरू असल्यामुळे कलाकारांसाठी जवळच होमस्टे घेतलं होतं. 43 वर्षीय अभिनेते निजू यांनी चित्रपटातील कलाकारांसाठी आयोजित केलेल्या होमस्टेमध्ये छातीत दुखण्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. नुकताच रिलीज झालेला साऊथ ब्लॉकबस्टर सिनेमा मार्कोमध्ये दिसलेल्या निजू यांनी ऋषभ शेट्टी याच्या चित्रपटात काम मिळविण्यासाठी ऑडिशन दिल्याची माहिती समोर आली आहे. मिमिक्री आर्टिस्ट कन्नन सागर यांनी निजू यांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि गुरुवारी रात्री 10.30 वाजता एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्यांना याबद्दल माहिती देण्यात आल्याचं सांगितलं. 

'कांतारा: चॅप्टर 1'च्या सेटवरचा तिसरा मृत्यू

दुर्दैवानं, 'कांतारा: चॅप्टर 1'च्या टीमनं अलिकडेच पाहिलेला हा पहिलाच मृत्यू नाही. या वर्षी मे महिन्यात, कन्नड अभिनेता-कॉमेडियन राकेश पुजारी यांचं वयाच्या 33 व्या वर्षी एका मित्राच्या लग्नात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. यापूर्वी, त्याच महिन्यात, केरळमधील 32 वर्षीय कनिष्ठ कलाकार एमएफ कपिल सौपर्णीका नदीच्या प्रवाहात अडकून मृत्युमुखी पडले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, 20 ज्युनिअर अॅक्टर्सना घेऊन जाणारी मिनीबस मुदुर येथे अपघातात कोसळली पण, सुदैवानं सगळे बचावले. त्याआधी, 'कांतारा: चॅप्टर 1'साठी डिझाइन केलेला एक महागडा सेट मुसळधार पावसात उद्ध्वस्त झालेला.

दरम्यान, 'कांतारा: चॅप्टर 1' हा ऋषभ शेट्टीच्या 2022 च्या हिट 'कांतारा'चा प्रीक्वल आहे. हा चित्रपट होम्बाले फिल्म्सनं तयार केला आहे, ज्यानं अलीकडेच केजीएफ आणि सालारची निर्मिती केली आहे. या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऋषभ पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dharmendra Kissing Scene With Shabana Azmi: 'माझ्या एका किसनं लोक हादरुन गेले...'; 87 वर्षांचे धर्मेंद्र अन् 72 वर्षांच्या शबाना आझमींचा 'तो' लिपलॉक सीन