Swapnil Joshi : अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरला आहे. नुकतच त्याचा वाळवी हा चित्रपट आला होता. परेश मोकाशींनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. अभिनेता म्हणून आपली भूमिका बजावतानाच स्वप्नील जोशीने आता निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. नुकतच 'नाच गं घुमा' (Naach g Ghuma) या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं. त्यानिमित्ताने स्वप्नीलने त्याच्या निर्माता म्हणून भावना व्यक्त केल्या आहेत. 


मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशी ओळखला जातो. आता स्वप्नील नाच गं घुमा या चित्रपटात सह निर्माता म्हणून काम करत आहे. परेश मोकाशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. त्यांच्यासोबत स्वप्नीलने देखील या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्माता म्हणून हातून चांगली कलाकृती घडलं ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट असते, अशा भावना यावेळी स्वप्नील जोशीने व्यक्त केल्या आहेत. 


'चांगल्या कलाकृतीचा भागं होणं...'


स्वप्नीलने यावेळी त्याच्या भावना व्यक्त करत म्हटलं की,  एक निर्माता म्हणून चांगल्या कलाकृतीचा भाग होणं आणि हातून चांगली कलाकृती घडणं ही खूप कमालीची बाब आहे. एक उत्तम माणूस घडताना आज माझ्या आयुष्यात स्त्री वर्गाचा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणून नाच गं घुमासारखा चित्रपट माझ्याहातून घडण हा निव्वळ योगायोग आहे, असं मला वाटतं, अशा भावना स्वप्नीलने व्यक्त केल्या आहेत. 


आयुष्यात एकदा तरी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती


या चित्रपटाचा सह निर्माता होण ही माझ्यासाठी खूप आनंद देऊन जाणारी गोष्ट आहे. मी कायम परेश मोकाशीचे चित्रपट बघत आलो आणि मी त्यांचा फॅन आहे. म्हणून आयुष्यात एकदा तरी त्यांच्यासोबत काम करायला मिळावं ही इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. वाळवी पासून हा प्रवास सुरू होऊन आता नाच गं घुमापर्यंत येऊन पोहचला असल्याचं स्वप्नीलने यावेळी सांगितलं.


चांगल्या गोष्टींचा भाग होण्याचा अभिमान कायम असतो - स्वप्नील जोशी


या चित्रपटाच्या निमित्ताने मधुगंधा आणि परेश यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली आहे. या दोघांमुळे मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतोय. नुकतच चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण होऊन महिला दिनाच्या दिवशी या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे, ही आमच्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. उत्तम कथानक, उत्कृष्ट संगीत आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या सगळ्यांचा मेळ जुळून येऊन "नाच गं घुमा " घडतोय याचा खूप आनंद आहे.चांगल्या गोष्टींचा भाग होण्याचा अभिमान कायम असतो आणि यावेळी वेगळ्या भूमिकेत असल्याने हा अभिमान अजून जास्त वाढला आहे, अशी प्रतिक्रिया स्वप्नीलने दिली. 






ही बातमी वाचा : 


Amir Khan : 2 मिनिटांसाठी 7 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, आमिरच्या 'त्या' लूकचा 'तारे जमीन पर'च्या ईशाननेच केला खुलासा