Swapnil Joshi Buy Luxury Car : मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा 'मितवा', 'क्लासमेट', 'दुनियादारी', 'मुंबई-पुणे-मुंबई' यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून मराठी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या स्वप्नील जोशीनं (Swapnil Joshi) मराठीसह हिंदी इंडस्ट्रीतही मोठं नाव कमावलं. स्वप्नीलनं इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून काम सुरू केलं आणि आज तो मराठीतला सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. स्वप्नीलबाबत सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या गोड प्रसंगामुळे चाहतेही खूश झाले आहेत. 


स्वप्नीलनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली. स्वप्नील आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अशीच एक गोड बातमी स्वप्नीलनं शेअर केली आहे. वर्षाखेरीस स्वप्नीलच्या घरात गोड पाहुणीचं आगमन झाल्याचं त्यानं चाहत्यांना सांगितलं आहे. चाहत्यांसाठी त्यानं या पाहुणीची एक झलक आपल्या इन्स्टा हॅन्डलवर शेअर केली आहे. चाहत्यांकडून स्वप्नीलच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. ही नवी गाडी खरेदी केल्यावर स्वप्नीलची खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती झाली आहे. स्वप्नीलच्या घरी आलेली नवी पाहुणी म्हणजे, त्यानं घेतलेली त्याची नवी कोरी लग्झरी कार. स्वप्नीलनं डिफेंडर घेतली आहे. ही लग्झरी कार खरेदी करुन स्वप्नपूर्वी झाल्याचं स्वप्नील म्हणतो. स्वप्नीलनं घेतलेल्या या नव्याकोऱ्या गाडीची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. 






स्वप्नील जोशी यानं 3 डिसेंबरला आपल्या नव्या कोऱ्या लग्झरी कारची पहिली झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली. त्यासोबत स्वप्नीलनं एक भारी कॅप्शन लिहिलं होतं. स्वप्नीलनं लिहिलेलं की, "तर, आज ही खास गोष्ट घडली. डिफेंडर… माझी नवीन गाडी, स्वप्नपूर्ती", असं कॅप्शन अभिनेत्यानं या फोटोला दिला आहे. स्वप्नीलची नवी गाडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या शोरुममध्ये हटके स्वागत करण्यात आलं. स्वप्नील आणि संपूर्ण जोशी कुटुंबियांना ओवाळण्यात आलं. तसेच, त्यानं खरेदी केलेल्या कारच्या आसपास स्वप्नीलच्या डायलॉग्सचे मोठाले फ्लेक्स लावण्यात आलेले. 


स्वप्नील जोशीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी स्वप्नीलचा 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता सध्या स्वप्नील त्याच्या आगामी 'जिलबी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नव्या वर्षात स्वप्नीलचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी स्वप्नीलनं चाहत्यांसाठी 'Ask Me Anything' सेशन ठेवलं होतं. त्यामध्ये स्वप्नीलला एका चाहत्यानं मुंबई पुणे मुंबई 4 बाबत विचारलं होतं. तेव्हापासून मुंबई पुणे मुंबई 4 बाबत सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मुंबई पुणे मुंबई 4 कधी येणार? मुक्ता बर्वेला टॅग करत खुद्द स्वप्नील जोशीनं दिलं उत्तर, म्हणाला...