Singer KK Passes Away :  प्रसिद्ध गायक केके  (Singer KK) उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद अशी करण्यात आली आहे. केके यांच्या मृत्यूप्रकरणी आयोजक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. हा कार्यक्रम गुरुदास महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. उत्कर्ष 2022 असं या कार्यक्रमाचं नावं होतं. नजरूल मंचावर हा कार्यक्रम पार पडला होता. गायक केके यांचे कुटुंबीय आज कोलकाता येथे येत आहेत. केके यांचा मृत्यू शारिरीक आजाराने झाला की अन्य कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत.


केके यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे.


दिलीप घोष यांनी राज्य सरकारसमोर काही प्रश्न उपस्थित केला आहे. 'ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले ती पद्धत योग्य नाही, याची चौकशी झाली पाहिजे' असं ते म्हणाले. दिलीप घोष पुढे म्हणाले की, 'तेथील एसीबंद होता तसेच गर्दी देखील होती. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी तेथे होती. या कारणामुळे त्यांची तब्येत बिघडली की काय, हे माहीत नाही. कारण कार्यक्रमामध्ये लोकांमध्ये एक्साइटमेंट असते.'


प्रसिद्ध बॉलिवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. ते केके या नावाने प्रसिद्ध होते. केके यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. रिपोर्टनुसार नजरुल मंच येथील कार्यक्रमामध्ये सुमारे एक तास गाणे गाऊन हॉटेलमध्ये परतले तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते.


इतर संबंधित बातम्या