Lalit Modi, Sushmita Sen : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen)आणि ललित मोदी (Lalit Modi) सध्या चर्चेत आहेत. ललित मोदी यांनी शेअर केलेल्या डेटिंगच्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. सुष्मिता सेन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. ललित मोदींच्या आधी काही सेलिब्रिटींना सुष्मितानं डेट केलेलं आहे.
विक्रम भट्टसुष्मिता सेन आणि विक्रम भट्ट यांच्या नात्याची सुरुवात दस्तक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. विक्रमचं लग्न झालं होतं. त्यामुळे हे नाते फार काळ टिकले नाही.
वसीम अक्रमसुष्मिता ही पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमच्या प्रेमात पडली होती. एका डान्स शोमध्ये वसीम आणि सुष्मिता यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला पण वसीमच्या संशय घेण्याच्या स्वभावामुळे सुष्मिता आणि वसीम यांचा ब्रेक-अप झाला, अशी चर्चा त्यावेळी सुरू होती. रणदीप हुड्डासुष्मिता सेन आणि अभिनेता रणदीप हुड्डा हे दोघे देखील एकमेकांना डेट करत होते . 'कर्म और होली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले. दोघे जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते.
ऋतिक भसीन2015 मध्ये सुष्मिता मुंबईतील हॉटेलचा मालक ऋतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. 2017 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाले.
मुदस्सर अजीजदिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्यासोबत देखील सुष्मिताचे नाव जोडले जात होते. सुष्मिताने दिग्दर्शक म्हणून मुदस्सरचा पहिला चित्रपट ‘दुल्हा मिल गया’मध्येही काम केले होते, जो फ्लॉप ठरला होता. जेव्हा मुदस्सरच्या डेटींगची बातमी समोर आली तेव्हा त्याचे नाव सुष्मितासोबत जोडले गेल्याने त्याचे कुटुंब खूप संतापले होते, त्यानंतर त्याने सुष्मितासोबत ब्रेकअप केले होते.
बंटी सचदेव बंटी सचदेवला काही वर्ष सुष्मिता डेट करत होती. बंटी सचदेव हा टॅलेंट कंपनीचा मालक आहे. तो सुष्मिताचा मॅनेजरही होता.
संजय नारंगहॉटेल चेन मालक संजय नारंग आणि सुष्मिता सेन यांनाही अनेक वेळा स्पॉट करण्यात आलं. सुष्मिताने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये नारंगबद्दल लिहिले आहे, तो सुष्मितापेक्षा 8 वर्ष मोठा आहे.
रोहमन शॉल रोहमन शॉल हा सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. 2018 मध्ये सुष्मितानं रोहमनला डेट करण्यास सुरुवात केली. पण 2021 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.
हेही वाचा: