Lalit Modi, Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांच्या डेटिंगच्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्यांनी खास पोस्ट ही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे सांगितलेय. मात्र, या पोस्टनंतर आता नेटकऱ्यांनी या विषयावर धमाल मीम्स शेअर केले आहे.


सोशल मीडियावर लोक या प्रकरणावर मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. दोघांच्या अफेअरची बाब चाहत्यांना पचनी पडलेली नाही. ट्विटर, इंस्टाग्रामवर लोकांनी धमाल मीम शेअर केले आहेत. काही मीम्स इतके मजेशीर आहेत की, ते पाहून तुम्हालाही हसू येईल.


पाहा सोशल मीडियावरील मीम्सचा पाऊस!


सोशल मीडियावर नेटकरी दोघांनाही ट्रोल करत आहेत. काही यूजर्स सुष्मिता सेनच्या एक्स बॉयफ्रेंडची यादी शेअर करत आहेत. तर, काही लोक सुष्मिताच्या मागील आयुष्याबद्दल टीका करणार्‍या पोस्ट देखील शेअर करत आहेत. अभिनेत्री सुष्मिता गेल्या काही वर्षापासून रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या ब्रेकअपला आता अवघे 6 महिने झाले आहेत. त्यातातच आता अभिनेत्री ललित मोदींना डेट करत असल्याने ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.






ललित मोदी यांनी सोशल मीडियावर अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलेय. ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी सुष्मिताचा उल्लेख बेटरहाप असा केलाय. ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोच्या आधारावर दोघांचा साखरपुडा झाल्याचं म्हटले जातेय. सुष्मिता सेनच्या बोटात अंगठी दिसत आहे.


ललित मोदी यांनी पहिल्या ट्विटमध्ये सुष्मिता सेन हिचा ‘बेटरहाफ’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर दुसऱ्या अन्य एका ट्विटमध्ये आम्ही अद्याप लग्न केले नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करु असे म्हटलेय. सुष्मिता सेन आणि ललित मोदी नुकतेच मालदिव आणि सार्डिनिया येथे फिरायला गेले होते. ललित मोदी लंडनमध्ये पोहचल्यानंतर ट्विट करत सुष्मिता सेनसोबतच्या नात्यांची माहिती दिली आहे.


संबंधित बातम्या


ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो


Lalit Modi Biopic: 'थालावी' आणि '83'चे निर्माता विष्णु वर्धान इंदुरी आता ललित मोदींवर चित्रपट बनवणार