Suraj Chavan Thanking DCM Ajit Pawar: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या नव्या घरामुळे (Suraj Chavan New Home) चर्चेत आहे. सूरजनं नुकताच त्याच्या नव्या घरात प्रवेश केलाय. याचा व्हिडीओ त्यानं त्याच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंटवरुन शेअर केलेला. या व्हिडीओवर कमेंट करुन सर्वांनी सूरजचं अभिनंदन करुन त्याला शुभेच्छा दिलेल्या. अशातच आता, सूरजनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे आभार मानले आहेत. कधीकाळी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सूरजचं स्वतःचं हक्काचं घर बांधण्याचं स्वप्न होतं. सूरजनं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम अजित पवारांमुळे पूर्ण झालंय. त्यामुळे अजित पवारांनी (Ajit Pawar) सूरज चव्हाणला घर बांधून दिलंय. त्यामुळे सूरजनं इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करुन त्यांचे आभार मानले आहेत.
सूरज चव्हाण यानं बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi) ट्रॉफी उंचावल्यानंतर अजित पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवारांनी सूरजला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द अजित पवारांनी पाळला आणि सूरजला अलीशान बंगला बांधून दिला. सर्व अद्ययावत सुख-सुविधांनी सज्ज असलेल्या नव्या घरात सूरजनं आता नुकताच गृहप्रवेश केला आहे. अजित पवारांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे सूरज चव्हाणचं खूप मोठं स्वप्न आता सत्यात उतरलंय. त्यामुळे सूरज चव्हाणनं एक पोस्ट करुन अजित पवारांचे आभार मानले आहेत.
सूरजनं पोस्टमध्ये काय म्हटलंय?
झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाणनं लिहिलंय की, "माझ्या नव्या घरात गृहप्रवेश केला... आदरणीय अजितदादा पवार... फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचं घर मिळालं... आपण नेहमी माझ्यासारख्या गोरगरीबाच्या मदतीला येता. यापुढे देखील असेच अनेकांच्या मदतीस याल अशी मला खात्री आहे. यात हस्ते परहस्ते मदत करणाऱ्यांचे देखील मनःपूर्वक आभार!"
सूरज चव्हाणनं नुकताच त्याच्या नव्या अलीशान घरात गृहप्रवेश केलाय. त्यानं त्याच्या घराचा व्हिडीओ नुकताच शेअर केलाय. सूरजनं नव्या घराता व्हिडीओ शेअर केल्यानंतर, त्याच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला. सूरजनं शेअर केलेल्या व्हिडीओवर अजित पवारांनीही एक कमेंट करुन सूरजला शुभेच्छा दिलेल्या. "सूरज, नवीन घरासाठी आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!", अशी कमेंट अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर केलेली.
सूरज चव्हाणची लगीनघाई
सूरज चव्हाण लवकरच आपल्या नव्या घरात आपला संसार थाटणार आहे. म्हणजेच, सूरज चव्हाण आता बोहोल्यावर चढणार आहे. सूरज चव्हाण आपल्या मामाची मुलगी संजना हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. येत्या 29 नोव्हेंबरला सूरज चव्हाणचा लग्नसोहळा पुण्यातील सासवड, जेजुरी इथे थाटामाटात पार पडणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :